शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

निवृत्त लष्करी डॉक्टर महिलेने केली पतीची हत्या; आरोपी महिलेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 12:22 AM

दारूच्या नशेत दोन मुलांसमोरच धारदार चाकूने भोसकले

हैदराबाद : लष्करातील एका निवृत्त महिला डॉक्टरने आपल्या पतीची भोसकून हत्या केल्याची घटना तेलंगणामध्ये घडली. विशेष म्हणजे तिचा पतीही निवृत्त लष्करी अधिकारी आहे. आपल्या दोन मुलांसमोरच तिने पतीला भोसकले. या महिलेला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, पती-पत्नीत झालेल्या वादातून हा प्रकार घडला.  बुंदलागुडा जागीर महानगरपालिका हद्दीतील मेपल शहरातील राजेंद्रनगरमध्ये हे निवृत्त लष्करी अधिकारी असलेले जोडपे राहत होते. निवृत्त कॅप्टन विशाल दिवाण आणि त्यांची पत्नी निवृत्त लेफ्टनंट कर्नल सबिना रोशन यांच्यात वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या सबिना यांनी धारदार चाकूने विशाल यांना भोसकले. त्यांच्या मुलांनीच पोलिसांना बोलावले. मुलांनी विशाल यांना शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात नेले. तथापि, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

शमशाबादचे डीसीपी प्रकाश रेड्डी यांनी सांगितले की, दोघा पती-पत्नीने रात्री सोबतच मद्यपान केले होते. मद्याच्या नशेत असतानाच दोघांचे भांडण जुंपले. पत्नीने रागाच्या भरात पतीवर धारदार चाकूने हल्ला केला.

पती-पत्नीत नेहमीच होत असत भांडणे

त्यांच्या दोन्ही मुलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्यात सातत्याने भांडणे होत असत. विशाल यांनी सबिना यांना गेल्याच महिन्यात मारहाण केली होती. विशाल यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उस्मानिया रुग्णालयात पाठविण्यात आला असून, सबिना यांना भादंवि ३0२ अन्वये अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Policeपोलिस