शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'निवृत्त होतोय, कुठलं तरी अध्यक्षपद द्या,' मुख्यमंत्र्यांच्या नावे अतिरिक्त पोलीस महासंचालकांचं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 20:48 IST

लखनऊ- उत्तर प्रदेशच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावे लिहिलेल्या पत्रानं एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमधल्या गृहविभागाचे डीजी सूर्यकुमार शुक्ला यांनी योगी आदित्यनाथांना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रातून सूर्यकुमार यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्यासाठी प्रचार करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारमधल्या रिकाम्या ...

लखनऊ- उत्तर प्रदेशच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावे लिहिलेल्या पत्रानं एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमधल्या गृहविभागाचे डीजी सूर्यकुमार शुक्ला यांनी योगी आदित्यनाथांना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रातून सूर्यकुमार यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्यासाठी प्रचार करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारमधल्या रिकाम्या असलेल्या आयोगांमध्ये मला सेवा बजावण्याची संधी द्यावी, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे.सूर्यकुमार शुक्ला हे 31 ऑगस्टला पोलीस दलातून निवृत्त होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रातून योगी आदित्यनाथ यांच्याकडे केलेल्या मागणीनं चर्चांना उधाण आलं आहे. सूर्यकुमार शुक्ला पत्रात लिहितात, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ फारच प्रामाणिक, कार्यतत्पर आहेत. त्यांच्या ऐतिहासिक कार्यातही मला सहभागी व्हायचं आहे. मी माझ्या कारकिर्दीत पूर्ण निष्ठेनं आणि प्रामाणिकपणानं जनतेची सेवा केली आहे. निवृत्तीनंतरही मला जनतेची आणि देशाची सेवा करण्याची इच्छा आहे. मला संघटनेची कार्ये आणि त्यांच्या विचारधारा पूर्णतः अवगत आहेत.उत्तर प्रदेशमधल्या अनेक जिल्ह्यांमधल्या पोलीस विभागात मी विविध पदं भूषवत जनतेची सेवा केली आहे. माझ्या या अनुभवाचा मी तुमच्यासाठी उपयोग करेन, मला विश्वास आहे की, तुम्ही उत्तर प्रदेशला विकसित राज्य बनवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नात माझा नक्कीच उपयोग होईल. तुमच्या सरकारमधील अनेक पदे अद्याप रिकामी आहेत. त्यातील कोणत्याही पदावर माझी नियुक्ती केल्यास मी तुम्हाला सहकार्य करेन. सूर्यकुमार यांनी उपाध्यक्ष योजना आयोग, अध्यक्ष खादी ग्रामोद्योग बोर्ड, अध्यक्ष राज्य समाज कल्याण बोर्ड आणि अध्यक्ष यूपी प्रदूषण नियंत्रण बोर्डांमधल्या कोणत्याही एका विभागात नियुक्ती देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश