शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे कुटुंबीयांच्या याचिकेवर महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 14:11 IST

तपासात प्रभावी प्रगती नाही

नवी दिल्ली : विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासावर अधिक देखरेख ठेवणे आवश्यक नसल्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले आहे.न्या. एम. एम. सुंदरेश आणि एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने १ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारकडून उत्तर मागितले. उच्च न्यायालयाच्या २ जानेवारीच्या आदेशाविरुद्ध पानसरे यांची कन्या आणि सुनेकडून ही याचिका दाखल करण्यात आली. खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, नोटीस जारी करावी.भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, लेखक गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूर शहरात मॉर्निंग वॉकच्यावेळी गोळीबार करण्यात आला. जखमी गोविंद पानसरे यांचा घटनेच्या चार दिवसांनी २० फेब्रुवारी २०१५ रोजी मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी बचावल्या.या हत्येचा तपास सुरुवातीला पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) केला होता. परंतु, नंतर २०२२ मध्ये तो महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आला. उच्च न्यायालय २०१६ पासून तपासावर देखरेख करत होते. तपास यंत्रणा नियमितपणे तथ्यात्मक स्थिती अहवाल सादर करत होत्या.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने ३ ऑगस्ट २०२२ रोजी मोठ्या कटाचा उलगडा करण्यासाठी आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास एसआयटीकडून एटीएसकडे हस्तांतरित केला होता, हे खंडपीठाने विचारात घेतले नाही.हत्या ही मोठ्या कटाचा भागया याचिकेत म्हटले आहे की, प्रकरण हस्तांतरित झाल्यानंतर एटीएसने तपासात कोणतीही महत्त्वपूर्ण प्रगती केली नसली तरी, तपासाचे निरीक्षण करणे आवश्यक नाही, कारण एटीएसचा मुख्य उद्देश फक्त फरार आरोपींचा शोध घेणे आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. एटीएसचा तपास पूर्ण होईपर्यंत तपासाचे निरीक्षण सुरू ठेवावे, ही त्यांची विनंती उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. एसआयटीने सादर केलेले तथ्य आणि आरोपपत्र हे स्पष्ट करते की ही केवळ हत्या नव्हती, तर ती एका मोठ्या कटाचा भाग होती.तपासात प्रभावी प्रगती नाहीयाचिकाकर्त्यांनी दावा केला की, डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कन्नड विद्वान एमएम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या एकमेकांशी जोडल्या गेल्या होत्या. परंतु, आतापर्यंत हल्लेखोर किंवा कट रचणारे सापडलेले नाहीत. त्यामुळे न्यायालयाकडून तपासाचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. एसआयटीकडून एटीएसकडे तपासाची जबाबदारी सोपवूनही, कोणतीही प्रभावी प्रगती झालेली नाही. दोन जानेवारी रोजीच्या आपल्या आदेशात, उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाला खटला जलदगतीने चालवण्यास आणि दररोज सुनावणी सुनिश्चित करण्यास सांगितले होते.