दाभिल येथील ग्रामसभेत रेशन दुकानदारासह पोलीस पाटील बदलण्याचा ठराव
By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30

दाभिल येथील ग्रामसभेत रेशन दुकानदारासह पोलीस पाटील बदलण्याचा ठराव
>* सभेत झाली धक्काबुक्कीदाभिल (ता. आजरा) येथील ग्रामसभेतील चर्चा ऐकण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पटांगणात महिला व नागरिकांनी केलेली गर्दी.क्रमांक : २२१२२०१४-गड-१२आजरा : दाभिल येथील स्वस्त धान्य दुकनदार जयश्री विठोबा यादव यांचा स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याबरोबरच विठोबा मारुती यादव यांचे पोलीस पाटील पद रद्द करावे, असा ठराव आज, सोमवारी बोलविण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत करण्यात आला. यावेळी काही ग्रामस्थांची व सदस्य श्रावण वाझे यांच्यात शाब्दिक चकमक व धक्काबुक्की झाली.सरपंच स्वाती श्रीपती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दाभिल ग्रामपंचायतीसमोर खास सभा बोलविण्यात आली होती. यावेळी ग्रामस्थांनी यादव दाम्पत्याचा स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याबरोबरच विठोबा यादव यांचे पोलीस पाटील पद रद्द करावे, असा ठराव करण्यात आला. सदर बैठकीत गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या तक्रारीचा विषय चर्चेत घेण्यात आला.सदर विषयाला श्रावण वाझे यांनी हरकत घेतली. ज्या विषयासाठी सभा बोलविली आहे त्याच विषयावर चर्चा व्हावी, असे त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. पण, ग्रामस्थांनी वाझे यांचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार शाब्दिक चकमक व वाझे यांना धक्काबुक्कीचा प्रकार घडला. यामध्ये वाझे हे किरकोळ जखमी झाले.वातावरण शांत झाल्यावर पुन्हा एकेवळ सभेला सुरुवात झाली. ज्ञानदेव गुरव यांनी पाणीपुरवठा योजनेची माहिती दिली. पाणीपुरवठा योजनेबाबत बोगस साद्वारे तक्रारी करणार्यांचा निषेध नोंदवत त्यांच्यावर मयत लोकांच्या व बोगस तक्रारी करणार्यांवर फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणीही केली.चर्चेत शांताराम पाटील, बबन कांबळे, दीपक गवळी, शांता कांबळे, रेखा सुतार, उपसरपंच संभाजी सुतार, अरूणा नार्वेकर यांनी सहभाग घेतला. ग्रामसेवक एल. आर. वापस्कर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)