शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:01 IST

डॉ. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यापक म्हणून काम केले

डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पंजाब प्रांतातील एका गावात (फाळणीनंतर आता हे गाव पाकिस्तानात आहे) झाला. डॉ. सिंग यांनी १९४८ साली मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले. १९६२ साली त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नूफिल्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात डी. फिल केले. त्यांनी भारतातील निर्यात, आत्मनिर्भरता व विकासाच्या शक्यता या पुस्तकात देशातील निर्यातीवर आधारित व्यापार धोरणावर टीका केली. डॉ. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यापक म्हणून काम केले. दरम्यान, त्यांनी काही वर्षे यूनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अॅड डेव्हलपमेंटच्या (यूएनसीटीएडी) सचिवालयातही काम केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन १९८७ आणि १९९० मध्ये त्यांची जिनिव्हा येथील दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

देशाला नवी उभारी देणारे एलपीजी मॉडेल...

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भारताच्या आर्थिक सुधारणांचे जनक म्हटले जाते ते त्यांनी आणलेल्या एलपीजी (लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन) मॉडेलमुळे! मनमोहन सिंग हे १० च्या दशकात पी. व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये देशाचे अर्थमंत्री होते. त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. खजिन्यात विदेशी चलन केवळ ५.८० अब्ज डॉलर एवढेच होते. त्यातून परदेशातून आयात करावयाच्या औषध, इंधन आदी अत्यावश्यक गोष्टी १५ दिवस पुरतील एवळधाच विकत घेणे शक्य होते. त्यावेळी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आयएमएफ) तसेच यूरोपातील काही देशांकडे कर्जाची मागणी केली. परंतु आयएमएफने कर्ज देण्यासाठी एक अट घातली. विदेशी कंपन्यांना देशात येऊन व्यापार करण्याची परवानगी भारताने द्यावी, अशी ती अट होती. अशीच अट यूरोपीयन देशांनीदेखील घातली होती. त्यातूनच मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने एलपीजी मॉडेल' आणले. त्यातूनच उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाला चालना मिळाली. सरकारने कंपन्यांच्या कारभारात कमीत कमी हस्तक्षेप करण्याचें धोरण अवलंबिले आर्थिक सुधारणांना गती दिली. वस्तू तसेच सेवांच्या क्षेत्रात विदेशी कंपन्यांना भारताचे द्वार खुले झाले. विदेशी कंपन्यांच्या बरोबरीनेच देशातील खासगी कंपन्यांनाही काम करण्याची संधी मिळाली. काही वर्षांतच देशाने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेतली. भारत आर्थिक निर्भरतेच्या वाटेवरून चालू लागला. आपण महासत्तेची स्वप्ने पाहतो, याची विजे या मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील 'एलपीजी मॉडेल'मुळेच रोवली गेली.

...अन् भारताला मिळाला माहितीचा अधिकार

मनमोहन सिंग सरकारच्या कार्यकाळात २००५ मध्ये पारित झालेल्या माहिती अधिकार कायद्याने भारतीय नागरिकांना सार्वजनिक प्राधिकरणांकडून माहिती मिळविण्याचा अधिकार दिला, त्यामुळे सरकारी यंत्रणा अधिक जबाबदार आणि पारदर्शक बनल्या. 

भूसंपादन कायदा: २९ ऑगस्ट २०१३ रोजी, राज्यसभेने भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन कायद्यात वाजवी भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार मंजूर केला. 

टॅग्स :Manmohan Singhडॉ. मनमोहन सिंगReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक