शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

अनुसूचित जाती जमातींना भारतीय लष्करात आरक्षण द्या - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 09:14 IST

नेहमीच उलट-सुलट विधाने करुन चर्चेत राहणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे विधान केले आहे.

मुंबई, दि. 20 - नेहमीच उलट-सुलट विधाने करुन चर्चेत राहणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे विधान केले आहे. भारतीय सैन्यात अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी)ला आरक्षण द्यायला हवे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय लष्करात एससी आणि एसटीला आरक्षण देण्यात यावे यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी यावर चर्चा केली आहे. काल एएनआयला दिलेल्या मुलाखतीत आठवले यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, भारतरत्‍न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या देशात सेवा करायला हवी. आठवले यांनी भारतीय तरुणांनी लष्करात भरती होऊन देशसेवेत आपलं योगदान देण्याची विनंतीही केली.अनुसूचित जाती जमातींना क्रिकेटमध्ये 25 टक्के आरक्षण द्या - रामदास आठवलेदरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाल्यानंतर आठवले यांनी या सामन्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी क्रिकेटमध्येही अनुसूचित जाती-जमातीला 25 टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता. इतका बलवान संघ अंतिम फेरीत 180 धावांनी पराभूत कसा होतो ? असा सवाल त्यांनी विचारला.वंदे मातरम् बोलण्यास नकार देण्यात काहीच गैर नाही - रामदास आठवलेजर एखादी व्यक्ती वंदे मातरम् बोलण्यास नकार देत असेल तर त्यात काहीच गैर नाही असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बोलले आहेत. समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने 'वंदे मातरम्'चा मुद्या जाणुनबुजून उपस्थित केला जात असल्याचा आरोपही यावेळी रामदास आठवले यांनी केला आहे. महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 'प्रत्येकाने वंदे मातरम् बोललं पाहिजे, पण जर एखादी व्यक्ती नाही बोलली तर त्यात चुकीचं काय ?', असा प्रश्न रामदास आठवले यांनी यावेळी उपस्थित केला. 'कोणी वंदे मातरम् बोलण्यास नकार देत असेल तर त्यात काहीच चुकीचं नाही', असं मत रामदास आठवले यांनी मांडलं.

टॅग्स :BJPभाजपाIndiaभारत