शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात आरक्षणाची मागणी, लिंगायत समाजाचा विधानसभेला घेराव घालण्याचा प्रयत्न; पोलिसांचा लाठीचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 19:30 IST

यावेळी आंदोलकांनी सुरक्षा कडे तोडून विधानसभेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. येथे सोमवारपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे.

आरक्षणाच्या मागणीवरून लिंगायत पंचमसाली समाजाच्या वतीने कर्नाटकातील बेळगाव येथे मंगळवारी (10 डिसेंबर 2024) निदर्शन करण्यात आले. समाजाचे धर्मिक प्रमुख बसवजय मृत्युंजय स्वामी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सुरक्षा कडे तोडून विधानसभेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. येथे सोमवारपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे.

आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर मोर्चा काढून विधानसभेला घेराव घालू, असा इशारा आंदोलकांनी दिला होता. यानंतर, पोलिसांनी विरोधीपक्षातील काही भाजप आमदारांना ताब्यात घेतले होते. तसेच, मृत्युंजय स्वामी तसेच त्यांच्या अनेक समर्थकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

लाठीचार्जचे व्हिडिओ सोशल मीडियावर -या लाठीचार्जचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात फाटलेल्या चपलांपासून ते इतर गोष्टींपर्यंत सर्व काही रस्त्यावर विखुरलेले दिसत असून पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार वादावादी होतानाही दिसत आहे. लाठीचार्ज दरम्यान एका आंदोलकाच्या डोक्यातून रक्त आले, त्याच्या पांढरा शर्ट देखील रक्ताने माखला होता. पोलीस त्याला अटक करणार होते, मात्र, इतर लोकांनी त्याला घेरले. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत सरकारी वाहने आणि आमदारांच्या वाहनांचेही नुकसान केले आहे.

"चर्चेसाठी बोलावले होते, पण.." -या चकमकीसंदर्भात बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. ते म्हणाले, पंचमसाली समाजाच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, ते आले नाहीत. लोकशाहीत लढण्याचा अधिकार आहे आणि आम्ही लढण्याच्या अधिकाराला विरोध करत नाही.”

 

टॅग्स :reservationआरक्षणKarnatakकर्नाटकcongressकाँग्रेसPoliceपोलिस