शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीश होण्यासही आरक्षण?

By admin | Updated: December 29, 2016 00:43 IST

न्यायाधीशांच्या नोकऱ्यांमधे अनुसूचित जाती-जमाती व ओबीसींच्या उमेदवारांना आरक्षण देण्याचा सरकार विचार करीत आहे. भाजपला बिहारमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून तोंडघशी

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली

न्यायाधीशांच्या नोकऱ्यांमधे अनुसूचित जाती-जमाती व ओबीसींच्या उमेदवारांना आरक्षण देण्याचा सरकार विचार करीत आहे. भाजपला बिहारमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून तोंडघशी पडावे लागले होते. अशीच अवस्था उत्तरप्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांत होऊ नये, यासाठी न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमधे आरक्षण देण्याची तयारी सरकारने चालवली आहे. केंद्र सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयात या आशयाचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवला जाईल, अशी माहिती आहे.मंत्रिमंडळाने लवकर मंजूर केल्यास उत्तरप्रदेशच नव्हे, तर पंजाबमध्येही त्याचा मोठा लाभ पक्षाला मिळू शकतो, असे भाजपला वाटत आहे. उत्तरप्रदेशात भाजपसमोर मायावतींचे मोठे आव्हान आहे, तर पंजाबमधे दलित मतदारांचे प्रमाण मोठे आहे. ही बाब लक्षात घेता आॅल इंडिया ज्युडिशिअल सर्व्हिसमध्येही आरक्षणाचा प्रस्ताव आणण्याचा विचार सुरू झाला आहे. या प्रस्तावानुसार जिल्हा स्तरावरील मॅजिस्ट्रेट व दिवाणी न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमधे दलित, आदिवासी व मागासवर्गियांना आरक्षणाचा लाभ मिळेल. पाठोपाठ लोकसेवा आयोगामार्फत होऊ घातलेल्या इंडियन ज्युडिशिअल सर्व्हिस या न्यायालयीन सेवेतही हे आरक्षण लागू करण्याचा विचार सरकारला करता येईल.भारतीय जानता पार्टीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूतकाळात यापूर्वीही न्यायव्यवस्थेत आरक्षण देण्याचा प्रस्ताव लागू करण्याचा प्रयत्न झाला. तथापि विविध न्यायालयांनी त्यावर लगेच स्थगिती आदेश बजावले. सरकारच्या नव्या प्रस्तावालाही न्यायालयांनी स्थगिती दिली, तरीही दलित आणि मागासवर्गियांच्या हक्कांबाबत भाजप संवेदनशील असल्याचा संदेश त्यामुळे पोहोचेल, असा पक्षाचा कयास आहे.