सेटलवाड यांच्या टि¦टबद्दल संताप
By Admin | Updated: August 24, 2014 02:32 IST2014-08-24T02:32:46+5:302014-08-24T02:32:46+5:30
सामाजिक कार्यकत्र्या तिस्ता सेटलवाड यांनी वादग्रस्त फोटो टि¦ट करीत सर्व स्तरातून रोष ओढवून घेतला आहे.

सेटलवाड यांच्या टि¦टबद्दल संताप
नवी दिल्ली : सामाजिक कार्यकत्र्या तिस्ता सेटलवाड यांनी वादग्रस्त फोटो टि¦ट करीत सर्व स्तरातून रोष ओढवून घेतला आहे. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्यांना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. चुकून फोटो टि¦ट झाल्याचे सांगत सेटलवाड यांनी माफी मागितली असली तरी प्रकरण पूर्णपणो संपण्याचे चिन्ह दिसत नाही.
फोटोशॉपमधील देवीच्या प्रतिमेत इराकमधील ईसीस या अतिरेकी संघटनेतील दहशतवाद्याचे शीर लावून टि¦ट केलेला फोटो लोड होताच सोशल मीडियावर रोष व्यक्त करणा:या अनेक प्रतिक्रिया धडकू लागल्या आहेत. शुक्रवारी सेटलवाड यांनी दोन-तीन फोटो विकृत स्वरूपात टि¦ट केले. त्यांनी एका फोटोत अमेरिकन पत्रकार जेम्स फॉली यांचे शीर कापण्यापूर्वी त्यांच्यासोबत ईसीसचा एक अतिरेकी दाखविला. ‘चिलिंग रियॅलिटी’ असे शीषर्क असलेल्या या फोटोखाली वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक दहशतवादी समांतर दिसत आहेत, अशा आशयाचा शेरा मारलेला आहे. सेटलवाड यांचे टि¦ट संवेदनहीन असल्याच्या प्रतिक्रिया काही मिनिटांतच झळकल्या. अनेकांनी याबाबत तीव्र रोष व्यक्त केला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
4सेटलवाड यांना 2क्क्7 मध्ये देण्यात आलेला पद्मश्री सन्मान परत घेण्याची मागणी बंगळुरू येथील प्रशांत कुमार यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज पाठवून केली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्याची मागणीही अनेकांनी केली.
4काहींनी एफआयआरसाठी तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शविली. सेटलवाड यांनी अनावश्यक वाद निर्माण केला असून हा चिथावणीजनक प्रकार असल्याचे काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चुतव्रेदी यांनी म्हटले आहे.
4प्रतिक्रियांचा भडिमार झाल्यानंतर सेटलवाड यांनी माफी मागत वादग्रस्त फोटो डिलिट केले. घिसाडघाईने चुकून दोन प्रतिमांची सरमिसळ झाली. यात कुणालाही दुखावण्याचा, रोष ओढवून घेण्याचा हेतू नव्हता, असे सेटलवाड यांनी लगेच टि¦ट केले.