शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनी सावधानतेचा इशारा

By admin | Updated: January 17, 2016 01:54 IST

पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कोठेही घातपात होऊ नये यासाठी राजधानी दिल्ली आणि अन्य संवेदनशील ठिकाणी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

- नवीन सिन्हा,  नवी दिल्लीपठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कोठेही घातपात होऊ नये यासाठी राजधानी दिल्ली आणि अन्य संवेदनशील ठिकाणी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत आयबी आणि अन्य सुरक्षा संस्थांनी दिलेल्या ताज्या माहितीच्या आधारे हे पाऊल उचलण्यात आले आहे.युद्धसदृश परिस्थितीत जी सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते, तशीच सुरक्षा व्यवस्था दिल्लीतील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान सीमेशिवाय नेपाळ आणि बांगलादेश यांच्या सीमेवरही घुसखोरी उधळून लावण्यासाठी सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. या काळात जैस-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोएबा यासारख्या दहशतवादी संघटनांकडून घुसखोरी केली जाण्याची शक्यता आहे. पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारने उचललेल्या पावलाने निर्माण झालेल्या वातावरणाला धक्का पोहोचविला जाण्याची शक्यता आहे. ही बाब ध्यानात घेऊन उपाययोजना आखल्या जात असल्याचे गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.पंजाब, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि अन्य काही राज्यांत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यातही पंजाब आणि जम्मू-काश्मिरात अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीत केंद्रीय दले आणि दिल्ली पोलिसातील १० हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत.यंदा प्रजासत्ताकदिनी फ्रेंच अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते इसिस आणि अन्य दहशतवादी संघटनांच्या हिट लिस्टवर आहेत. त्यामुळेच सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. या दृष्टीने अत्याधुनिक शस्त्रसामग्री देण्यात आली आहे. संचलन होणाऱ्या राजपथावर अतिशय कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. हा बंदोबस्त केवळ प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमापुरताच असेल असे नव्हे, तर सायंकाळीही कायम राहील. प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम सुरळीत पार पडावेत हा त्यामागचा हेतू असल्याचे गृहमंत्रालयाच्या या अधिकाऱ्याने सांगितले.गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी राज्याचे पोलीस आणि अन्य संस्थांना भारत-पाक सीमेवर, तसेच संपूर्ण राज्यात योग्य ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्यास सांगितले आहे. देशभरातील सुरक्षा व्यवस्थेवर निगराणी ठेवण्यासाठी दिल्लीत केंद्रीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा होणार उपयोगमंत्री मनोहर पर्रिकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.गेल्या सहा महिन्यांत जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरीचे जवळपास ५० प्रयत्न झाले होते. ते सीमा सुरक्षा दलाने उधळून लावले असले तरीही तेथे आणखी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यादृष्टीने सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना रात्री उपयोगी पडतील असे कॅमेरे आणि रडार यंत्रणा दिली जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले आणि दूरवरील चित्रीकरण करू शकतील, असे कॅमेरे महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवले जाईल. याशिवाय सोलार लाईट सिस्टीम आणि इन्स्टंट पॉवर बॅकअपची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यासाठी सरकार आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचीही मदत घेणार आहे. त्यात इस्रायलकडून अत्याधुनिक यंत्रणा घेतली जाईल. त्याद्वारे घुसखोरी रोखण्यासाठी भारत-पाक सीमेवर चांगले कुंपण घातले जाईल.अतिरेक्यांविरुद्ध झीरो टॉलरन्स गेल्या ६ महिन्यांत झालेल्या घुसखोरीच्या ५० प्रयत्नांपैकी २ प्रयत्न अतिशय गंभीर होते. बामियाल आणि लगतच्या नदी खोऱ्यावर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. अतिरेक्यांविरुद्ध झीरो टॉलरन्स स्वीकारण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून येथील सुरक्षा कडक करण्यात येणार आहे.