गणतंत्र दिवस अमर रहे - प्रजासत्ताक दिनी भाजप आमदाराची चुकीची घोषणा
By Admin | Updated: January 27, 2016 12:14 IST2016-01-27T11:18:18+5:302016-01-27T12:14:19+5:30
वाराणसीतील भाजप आमदार यांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजरोहणानंतर 'गणतंत्र दिवस अमर रहे' अशा चुकीच्या घोषणा दिल्या.

गणतंत्र दिवस अमर रहे - प्रजासत्ताक दिनी भाजप आमदाराची चुकीची घोषणा
ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. २७ - विविध विषयांवर देशातील नेत्यांची वादग्रस्तं वक्तव्ये आणि त्यांचा वाचाळपणा हा जनतेसाठी नवीन नाही, सत्ताधारी भाजपा नेतेही त्यात कमी नाहीत. पण उत्साहाच्या भरात भाजपाच्या एका आमदाराने प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन यात गल्लत करत २६ जानेवारी रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 'गणतंत्र दिन अमर रहे' अशा घोषणा दिल्याचा लज्जास्पद प्रकार घडला. विशेष म्हणजे हा आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातील आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ध्वजरोहण सोहळा पार पडल्यानंतर आमदार लक्ष्मण आचार्य यांनी ' भारत माता की जय' आणि ' गणतंत्र दिवस अमर रहे' अशी चुकीची घोषणा दिल्या, त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विशषेष म्हणजे उपस्थितांपैकी कोणीही आचार्य यांना थांबवण्याचे वा त्यांना त्यांची चूक दाखवण्याचे कष्ट घेतले नाहीत