शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

प्रजासत्ताक दिन; राष्ट्रपतींच्या बग्गीबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 3:44 PM

भारतामध्ये उद्या 26 जानेवारी रोजी 69 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला जाईल. या दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य सोहळ्याचे आणि संचलनाचे सर्वांनाच आकर्षण असते. या दिवशी वापरल्या जाणाऱ्या राष्ट्रपतींच्या बग्गीचा इतिहासही अत्यंत रोचक आहे.

नवी दिल्ली- भारतामध्ये उद्या 26 जानेवारी रोजी 69 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला जाईल. या दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य सोहळ्याचे आणि संचलनाचे सर्वांनाच आकर्षण असते. राष्ट्रपती या कार्यक्रमासाठी विशेष बग्गीमधून येऊन सहभागी होतात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती या पदावरुन प्रथमच या सोहळ्यासाठी उपस्थित राहाणार आहेत. राष्ट्रपतींच्या बग्गीचा इतिहासही अत्यंत रोचक आहे.

राष्ट्रपती सध्या वापरत असलेली बग्गी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये व्हॉइसरॉय किंवा गव्हर्नर जनरलकडून वापरली जायची. भारत स्वतंत्र झाल्यानंतर फाळणीच्यावेळेस अनेक वस्तू, वास्तूंचीही वाटणी करण्यात आली. गव्हर्नर जनरलच्या सुरक्षारक्षकांची भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 2:1 अशा प्रमाणात विभागणी करण्यात आली. आज त्याला प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड असे म्हटले जाते. 

 गव्हर्नर जनरलच्या बग्गीवर दोन्ही देशांनी हक्क सांगितल्यावर तिच्या विभागणीचा प्रश्न उभा राहिला. शेवटी नाणेफेक करुन तिची विभागणी करण्यात आली. गव्हर्नर जनरलच्या सुरक्षादलाच्या कमांडंटनी हा नाणेफेक करुन निर्णय दिला. राष्ट्रपतींच्या या बग्गीला भारतीय आणि ऑस्ट्रेलियन जातीच्या मिश्र संकराचे घोडे वापरले जातात. 1950 साली झालेल्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात या बग्गीला 6 ऑस्ट्रेलियन घोडे जुंपण्यात आले होते. 1984 पर्यंत या बग्गीचा उपयोग राष्ट्रपती करत होते. त्यानंतर तिचा वापर थांबवण्यात आला होता. मात्र माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या काळात तिचा पुन्हा वापर सुरु करण्यात आला.

पहिला प्रजासत्ताक सोहळा-२६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी गव्हर्नमेंट हाउसच्या दरबार हाउसमध्ये पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. देशातील पहिली परेड इंडिया गेट आणि राजपथ यांच्यामध्ये न होता, त्याच्या जवळ असलेल्या निर्वान स्टेडियममध्ये निघाली. त्याला आज ‘मे. ध्यानचंद स्टेडियम’ म्हणून ओळखले जाते. त्यादिवशी ध्वजाला ३१ तोफांची सलामी दिली गेली होती, त्यानंतर ध्वज फडकवण्यात आला. पहिला समारोह दुपारनंतर साजरा करण्यात आला. या वेळेस पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद ६ घोड्यांच्या बग्गीतून गव्हर्नमेंट हाउसमधून दुपारी २.३० वाजता निघाले. कॅनॉट प्लेस व ल्यूटेन्स झोन याला फेरी मारत, त्यांची फेरी स्टेडियमच्या आत पोहोचली व ३.४५ वाजता सलामी मंचापर्यंत पोहोचली, तेव्हा तिरंग्याला ३१ तोफांची सलामी देण्यात आली.

टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८Presidentराष्ट्राध्यक्षRamnath Kovindरामनाथ कोविंदNew Delhiनवी दिल्ली