नोटा पडल्याचे सांगून बॅग लंपास, गुन्हा नोंद
By Admin | Updated: May 11, 2014 00:04 IST2014-05-11T00:04:18+5:302014-05-11T00:04:18+5:30
मडगाव : खाली नोटा पडल्या आहेत असे सांगून बॅग लंपास करणारी टोळी पुन्हा एकदा किनारपटटी भागात सक्रिय झाली असून, शनिवारी अशाच प्रकारे कोलवा येथे एका महिलेची बॅग लंपास करुन आतील सोन्याचे दागिने व रोकड व मोबाईल मिळून ८८ हजारांचा माल लंपास करण्यात आला. भादंसंच्या ३७९ कलमाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. हवालदार विठु जल्मी तपास करत आहे.

नोटा पडल्याचे सांगून बॅग लंपास, गुन्हा नोंद
म गाव : खाली नोटा पडल्या आहेत असे सांगून बॅग लंपास करणारी टोळी पुन्हा एकदा किनारपटटी भागात सक्रिय झाली असून, शनिवारी अशाच प्रकारे कोलवा येथे एका महिलेची बॅग लंपास करुन आतील सोन्याचे दागिने व रोकड व मोबाईल मिळून ८८ हजारांचा माल लंपास करण्यात आला. भादंसंच्या ३७९ कलमाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. हवालदार विठु जल्मी तपास करत आहे.वराडमडडी - सावर्डे येथील एक गट शनिवारी सहलीसाठी आला होता. यातील काही महिला, मुले व पुरुष मंडळी आंघोळीसाठी गेले होते तर कांचन नाईक (४0) ही महिला अन्य एका वृध्देसह किनार्यावर होती. दुपारी दोघेजण तिच्याकडे आले व तुमच्या दोन दहाच्या नोटा व एक पाच रुपयांची नोट खाली पडली आहे असे सांगितले. त्या व्यक्तींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कांचन यानी मान दुसरीकडे वळविताच संशयिताने बॅग घेउन पोबारा केला. या बॅगेत एक मंगळसुत्र, पाच मोबाईल व चार हजार रोखड असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयित हिंदी भाषेत बोलत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली असून, पुढील तपास चालू असल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)