'अलवर हत्याप्रकरणी आठवडाभरात अहवाल द्या'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:57 IST2018-08-20T23:57:31+5:302018-08-20T23:57:59+5:30
सुप्रीम कोर्टाचा राजस्थान सरकारला आदेश

'अलवर हत्याप्रकरणी आठवडाभरात अहवाल द्या'
नवी दिल्ली : अलवर येथे रकबर खान या शेतकऱ्याची काही जणांनी जबर मारहाण करुन २० जुलै रोजी हत्या केली होती. या प्रकरणी काय कारवाई केली याची माहिती एका आठवडाभरात सादर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान सरकारला सोमवारी दिला आहे.
झुंडशाहीच्या प्रकारांना व गोरक्षणाच्या नावाखाली होणाºया अत्याचारांना रोखण्यासाठी केंद्राने नवा कडक कायदा करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने १७ जुलै रोजी दिला होता. या तपासात न्यायालयाचा निकालाचा मान न राखल्याने राजस्थानचे मुख्य सचिव व पोलिस महासंचालक यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करावी, अशी मागणी या याचिकेत काँग्रेस नेते तहसीन पुनावाला यांनी केली आहे. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे.