वादग्रस्त मेजर गोगोई यांची बदली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 00:43 IST2018-09-20T00:42:07+5:302018-09-20T00:43:07+5:30
वादात सापडलेले लष्करी अधिकारी मेजर लितूल गोगोई यांची बडगामहून अन्यत्र बदली

वादग्रस्त मेजर गोगोई यांची बदली
श्रीनगर : तरुणांकडून होणाऱ्या दगडफेकीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी एका स्थानिक व्यक्तीला आपल्या जीपच्या बोनेटला बांधून ठेवल्याने वादात सापडलेले लष्करी अधिकारी मेजर लितूल गोगोई यांची बडगामहून अन्यत्र बदली करण्यात आली आहे.
या प्रकारानंतर त्यांच्यावर अनेक स्तरांतून टीका झाली होती. मात्र, लष्करप्रमुखांनी त्यांचे समर्थन केले होते. मात्र, त्यानंतर ते १८ वर्षांच्या एका तरुणीसह श्रीनगरमधील एका हॉटेलात गेले होते. तिथे त्यांनी व्यवस्थापकाकडे रूमची मागणी केली होती. स्थानिक तरुणींना हॉटेलात रूम देण्याची पद्धत नसल्याचे सांगून व्यवस्थापकाने त्यांना नकार दिला होता. त्यामुळे गोगोई यांनी हॉटेलात गोंधळ घालून कर्मचाºयांना दमदाटी केली. त्यापूर्वी ते त्या तरुणीच्या घरीही गेले होते. ते घरी आल्याने घाबरले होते; पण भीतीमुळे कोणाला सांगितले नाही, असे तरुणीच्या आईनेच नंतर सांगितले होते.