हरियाणातील ती घटना ‘निर्भया’ची पुनरावृत्ती

By Admin | Updated: May 15, 2017 00:14 IST2017-05-15T00:14:55+5:302017-05-15T00:14:55+5:30

हरियाणाच्या रोहतक येथील सामूहिक बलात्कार प्रकरणात रविवारी अंगावर शहारे आणणारी आणखी भयंकर माहिती समोर आली

Repeat of 'Nirbhaya' incident in Haryana | हरियाणातील ती घटना ‘निर्भया’ची पुनरावृत्ती

हरियाणातील ती घटना ‘निर्भया’ची पुनरावृत्ती

चंदीगड : हरियाणाच्या रोहतक येथील सामूहिक बलात्कार प्रकरणात रविवारी अंगावर शहारे आणणारी आणखी भयंकर माहिती समोर आली. त्यानंतर ही घटना दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणाची पुनरावृत्ती असल्याचे स्पष्ट झाले.
२२ वर्षांच्या घटस्फोटीत दलित तरुणीवर दोन नराधमांनी बलात्कार केला, तिच्या गुप्तांगात तीक्ष्ण हत्यार खुपसले आणि नंतर दगडाने ठेचून खून करून तिचा मृतदेह एका औद्योगिक वसाहतीत निर्जन रस्त्यावर फेकून दिला. ‘निर्भया’च्या चार बलात्कारी मारेकऱ्यांची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर सात दिवसांत ही घटना घडली. पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसांनी आपल्या तक्रारीकडे लक्ष न दिल्याचा आरोप केला.
पीडितेच्या कपाळाच्या हाडाचा भुगा झाल्याचे तसेच तिच्या गुप्तांगात धारदार शस्त्र खुपसल्याचे दिसते. पीडितेची उत्तरीय तपासणी रोहतक येथील पोस्ट ग्रॅ्रज्युएट इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस येथे करण्यात आली. तेथील फोरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. एस. के. धत्तेरवाल म्हणाले की, ती अमानुष बलात्कार आणि निर्घृण हत्येची घटना होती, असे उत्तरीय तपासणीतून समोर आले. हरियाणा पोलिसांनी मुख्य आरोपी सुमितसह दोन जणांना अटक केली आहे. सुमितही दलित आहे.
(वृत्तसंस्था)

Web Title: Repeat of 'Nirbhaya' incident in Haryana