शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आता हिची सटकली ! 'बलात्कार, लैंगिक अत्याचार व भ्रूण हत्या बॅन करा', 'पद्मावत बॅन'विरोधात अभिनेत्री भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 13:14 IST

'पद्मावत' सिनेमाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांना रेणुका शहाणेनं तीव्र विरोध दर्शवत निषेध व्यक्त केला आहे.

मुंबई - 'पद्मावत' सिनेमावरुन देशभरात सुरू असलेल्या वादात अभिनेत्री रेणुका शहाणेनं उडी घेतली आहे. 'पद्मावत' सिनेमाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांना रेणुका शहाणेनं तीव्र विरोध दर्शवत निषेध व्यक्त केला आहे. पद्मावत सिनेमाच्या समर्थनार्थ रेणुका शहाणेनं आपल्या फेसबुक अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. पोस्ट करण्यात आलेल्या फोटोच्या माध्यमातून समाजाशी संबंधीत महत्त्वपूर्ण संदेश देण्याचा प्रयत्न तिच्याकडून करण्यात आला आहे. पद्मावत सिनेमावर बंदी आणण्याऐवजी महिलांवर होणा-या अत्याचारांवर बंदी आणा, असा महत्त्वपूर्ण संदेश रेणुका शहाणे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला आहे. 

महिलांवर होणारे बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि भ्रूण हत्या यांसारख्या अत्याचारांविरोधात लढण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न रेणुकानं केला आहे.  रेणुका शहाणेच्या पहिल्या फोटोमध्ये 'पद्मावत बॅन'च्या पोस्टरवर फुल्लीची खूण केलेली पाहायला मिळत आहे. यानंतरच्या फोटोंमध्ये महिलांवरील बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि भ्रूण हत्यावर बंदी आणण्यासंदर्भातील संदेश देणारे पोस्टर रेणुका शहाणेच्या हातात दिसत आहेत. 'पद्मावत'च्या समर्थनार्थ रेणुका शहाणे केलेले हे फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. 

कुरुक्षेत्रमधील मॉलमध्ये गोळीबार व तोडफोड हरियाणामधील कुरुक्षेत्र येथे पद्मावत सिनेमाविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले. कुरुक्षेत्रमधील केसल मॉलमध्ये अज्ञातांनी गोळीबार करत तोडफोडदेखील केली. रविवारी (21 जानेवारी) संध्याकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. दरम्यान,  एकीकडे हरियाणातील मंत्री अनिल विज पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनावेळी सिनेमागृहांना पूर्ण संरक्षण पुरवण्याची तयारी दर्शवत आहेत आणि दुसरीकडे स्वाभिमानी व सच्च्या देशभक्तानं हा सिनेमा पाहू नये, असं वारंवार सांगत आहेत. 

गुरुग्राममधील सिनेमागृह मालकांना धमकीदरम्यान, कोणत्याही परिस्थिती पद्मावत सिनेमा प्रदर्शित होऊ न देण्याच्या निर्णयावर करणी सेना ठाम आहे. अनेक राज्यांमध्ये करणी सेनेनं पद्मावत सिनेमाविरोधात तीव्र निदर्शन केली आहेत. आता गुरुग्राममधील सिनेमागृहांच्या मालकांनी पद्मावत प्रदर्शित करू नये,यासाठी पत्रांचं वाटप करत त्यांना धमकावण्यात आले आहे. 

टॅग्स :Padmavatपद्मावतRenuka Shahaneरेणुका शहाणेSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साळीDeepika Padukoneदीपिका पादुकोण