इंदिरा गांधी चौकाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण
By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:46+5:302015-09-03T23:05:46+5:30
नाशिक : बीयोटी तत्त्वानुसार खाबिया ग्रुपतर्फे नूतनीकरण करण्यात आलेल्या शालिमार चौकातील स्व. इंदिरा गांधी चौकाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

इंदिरा गांधी चौकाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण
न शिक : बीयोटी तत्त्वानुसार खाबिया ग्रुपतर्फे नूतनीकरण करण्यात आलेल्या शालिमार चौकातील स्व. इंदिरा गांधी चौकाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या बेटाचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी खाबिया गु्रपने स्वीकारली होती. त्यानुसार चौकाच्या मध्यभागी स्व. इंदिरा गांधी यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला. तसेच मध्यभागी नाशिक महापालिकेचा नामोल्लेख असलेल्या स्तंभ असून, दुर्तफा असलेल्या हिरवळीमुळे बेटाच्या सौंदर्यात भर पडत आहे. दरम्यान, दोन दिवस नाशिक दौर्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी फीत कापून व हवेत फुगे सोडून बेटाचे उद्घाटन केले. यावेळी गुरुमाउली अण्णासाहेब मोरे, मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, सभागृहनेता सलिम शेख, नगरसेवक यशवंत निकुळे, विनायक पांडे, माधुरी जाधव, अशोक सातभाई, शशिकांत जाधव, शिवाजी गांगुर्डे, क्रेडाईचे अध्यक्ष जयेश ठक्कर, जैन समाजाच्या सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष मोहन लोढा, खाबिया ग्रुपचे प्रवीण खाबिया, किशोर खाबिया आदि उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी बेटाच्या दुर्तफा लावण्यात आलेल्या झाडांची माहिती घेतली. तसेच सुशोभिकरणाबाबत खाबिया ग्रुपचे अभिनंदन केले. ----फोटोफोटो क्र. १४१ ओळी : शालिमार चौकातील नूतनीकरणानंतर उजळलेला इंदिरा गांधी चौक.फोटो क्र. १४३ ओळी : नूतनीकरण करण्यात आलेल्या इंदिरा गांधी चौकाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे. समवेत खाबिया ग्रुपचे प्रवीण खाबिया, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, गुरुमाउली अण्णासाहेब मोरे, किशोर खाबिया, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम.