विमानतळावरील विशेष सुरक्षा काढा-प्रियंका गांधी
By Admin | Updated: May 31, 2014 11:51 IST2014-05-31T01:45:16+5:302014-05-31T11:51:06+5:30
नवी दिल्ली : प्रियंका गांधी यांनी विमानतळावर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा तपासणीत मिळणारी सवलत मागे घेण्याची एसपीजीला विनंती केली आहे.

विमानतळावरील विशेष सुरक्षा काढा-प्रियंका गांधी
नवी दिल्ली : प्रियंका गांधी यांनी विमानतळावर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा तपासणीत मिळणारी सवलत मागे घेण्याची एसपीजीला विनंती केली आहे.
सरकार प्रियंका आणि पती रॉबर्ट वड्रा यांची विमानतळावरील विशेष सुविधा परत घेण्याबद्दल विचार करीत असल्याचे वृत्त आले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी एसपीजीकडे ही विनंती केली आहे.
प्रियंका गांधी यांनी एसपीजी प्रमुख दुर्गा प्रसाद यांना लिहिलेल्या पत्रात रॉबर्ट वड्रा यांची विमानतळावरील विशेष सुविधा काढून टाकण्याबद्दल विचार करण्यात येत असल्याच्या वृत्ताचा संदर्भ दिला आणि तसे लवरात लवकर केल्यास आपल्या आनंदच होईल, असेही त्या म्हणाल्या.
विमानतळावरील विशेष सुविधा मिळणार्यांच्या यादीत वड्रा यांचे नाव या पूर्वीचे एसपीजी प्रमुख आणि दिल्ली पोलिसांनी समाविष्ट केले होते. त्यासाठी आमच्या पैकी कुणीही विनंती केली नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे.