शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

Remdesivir : धक्कादायक, रेमडेसिविरची नकली इंजेक्शन दिलेल्या रुग्णांपैकी ९० टक्के कोरोनाबाधित झाले बरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 16:15 IST

Coronavirus in India: पोलिसांनीच हा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. तसेच याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

भोपाळ - देशात कोरोनारुग्णांची दुसरी लाट आल्यानंतर ऑक्सिजनसोबतच रेमडेसिविर इंजेक्शनचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. त्यामधून रेमडेसिविरची साठेबाजी, काळाबाजार आणि बनावट रेमडेसिविर (Remdesivir ) इंजेक्शनच्या विक्रीला ऊत आला होता. दरम्यान, मध्य प्रदेशमधील इंदूर आणि जबलपूरमध्ये ज्या कोरोनाबाधित रुग्णांना गुजरातमधून आलेले नकली रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात आले त्यांच्यापैकी ९० टक्के रुग्णांच्या फुप्फुसामधील संसर्ग बरा झाल्याची धक्कादायक पण आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. पोलिसांनीच हा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. तसेच याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.  (90% of the Corona patients who received the fake injection of Remdesivir recovered)

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, इंदूरमध्ये ज्या लोकांना बनावट रेमडेसिविरचे इंजेक्शन दिले गेले, त्यांच्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला. मात्र या इंजेक्शनमध्ये केवळ ग्लुकोज आणि मीठाचे पाणी असूनही १०० हून अधिक जण बरे झाले आहेत. मात्र ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याने त्यांच्या शरीराची तपासणी करता येणे शक्य नाही.   इंदूरमधील विजयनगर येथून दोन दिवसांपूर्वीच चार जणांना अटक करण्यात आली होती. तर या प्रकरणात पोलिसांना डझरभर लोकांना ताब्यात घेतले आहे. आता पोलीस या प्रकरणातील मुख्य आरोपी सुनील मिश्रा, पुनीत शाहा आणि कौशल वोरा यांना गुजरातहून ताब्यात घेणार आहेत. तर पोलिसांनी प्रशांत पाराशर याला भोपळ येथून अटक केली आहे. त्याने १०० नकली रेमडेसिविर इंजेक्शन मुख्य आरोपी सुनील मिश्रा याच्याकडून खरेदी केली होती. दरम्यान, प्रशांत पाराशर हा काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता असून, कोरोनाकाळात त्याच्याकडे काही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याचे समोर आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुजराहून ७०० नकली रेमडेसिविर इंजेक्शन मध्य प्रदेशात आणण्यात आळी होती. पहिल्यांदा २०० आणि नंतर ५०० नकली रेमडेसिविर आणली गेली होती. त्यातील १०० रेमडेसिविर प्रशांत पाराशर याला विकण्यात आली. दरम्यान, गुजरातमध्ये या रॅकेटचा भांडाफोड झाल्यावर जबलपूरमधील आरोपी सपन जैन याने पुरावे नष्ट करण्यासाठी ही इंजेक्शन नदीत फेकली होती. दरम्यान, ६० रुग्णांवर या बनावट रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करण्यात आल्याचे एका आरोपीने सांगितले.  

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीरcorona virusकोरोना वायरस बातम्याGujaratगुजरातMadhya Pradeshमध्य प्रदेशHealthआरोग्य