शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

Remdesivir injection : मोठी बातमी! येत्या ४-५ दिवसात मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होणार; कोविड-19 टास्क फोर्सची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 18:50 IST

Remdesivir injection CoronaVirus News & Latest Updates : रेमडेसिविरचा काळा बाजार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान राज्याच्या कोविड-19 टास्क फोर्सचे डॉ. तात्याराव लहाने यांन रेमडेसिविरबाबत माहिती दिली आहे.

देशभरात कोरोना व्हायरसचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येनं लोकांना संक्रमण झालं आहे. मुंबई, पुण्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा पडत आहे. नातेवाईकांना रेमडेसिविर देण्यासाठी लोकांना मेडिकलच्या बाहेर लांबच लांब रांगा लावलेल्या पाहायला मिळत आहे. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहे. तसंच रेमडेसिविरचा काळा बाजार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान राज्याच्या कोविड-19 टास्क फोर्सचे डॉ. तात्याराव लहाने यांनी रेमडेसिविरच्या पुरवठ्याबाबत माहिती दिली आहे. 

पुढच्या चार ते पाच दिवसात म्हणजेच १७ ते २० एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणात राज्यात रेमेडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होतील, असा दिलासा डॉ. लहाने यांनी दिला आहे. त्याशिवाय रेमेडिसिवीरचा काळाबाजार होऊ नये म्हणून नियंत्रण कक्ष कृत्रिम टंचाई टाळण्यासाठी सर्तक आहेत. याच्या किंमतीवर राज्यसरकार नियंत्रण आणू शकणार नाही, हे ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाच्या म्हणजेच केंद्राच्या अखत्यारीत येतं. रेमेडेसिवीर 17 तारखेनंतर मिळायला सुरुवात होईल आणि 20 एप्रिलपर्यंत लोकांची तक्रार राहणार नाही असा विश्वास राज्याच्या कोविड-19 टास्क फोर्सचे डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केला.

पुढे त्यांनी सांगितले की, ''सध्या राज्यात मोठ्या स्तरावर RTPCR चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे वैद्यकिय यंत्रणावरचा ताण वाढत आहे. परिणामी कोरोना चाचणीचे रिपोर्ट उशीरा मिळत आहेत. खाजगी लॅब क्षमतेपेक्षा अधिक नमुने घेत आहेत, त्यामुळे 24 तासांत रिपोर्ट देणं शक्य होत नाहीये. त्यांना क्षमता वाढवा किंवा क्षमते एव्हढेच नमुने घ्या, असंही त्यांना सांगण्यात आलं आहे. याशिवाय राज्यात चाचणी किटचा तुटवडा नाही.''  

लस घेतली तरी कोरोना होतोच, मग कशासाठी घ्यायची लस?; डॉ. संजय ओक यांनी सांगितले अनुभवाचे बोल

''सद्यस्थितीत महाराष्ट्रात कोरोनाने मृत्यू होत असलेल्यांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे कोरोना वाढण्याआधीच थांबवायला हवं लक्षणं दिसत असल्यास त्वरित कोविडची चाचणी करून घ्यायला हवी. अनेकजण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत दगावत आहेत. म्हणून सावध राहणं गरजेचं आहे.'' असंही  डॉ. लहाने यांनी सांगितले.

भारतात ४ ते ६ परदेशी कोरोना लसी येणार; जाणून घ्या किंमत किती असणार

रेमडेसीवीर बनविणारी कंपनी दोन दिवसांपासून बंद

देशात रेमडेसीवीर लस बनविणाऱ्या ७ कंपन्या आहेत. यापैकी एक मोठी कंपनी असलेली हैदराबादची हेट्रो फार्मा (hetero pharma) ही कंपनी गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. यामुळे लसीची मोठी गरज असताना ही कंपनी बंद राहिल्याने याचा फटका लसीच्या पुरवठ्यावर झाला आहे. या कंपनीचा हैदराबादचा प्लांट बंद आहे. ही एकटी कंपनी दररोज ३२ हजार लसी तयार करते. गेले दोन दिवस सुटी असल्याने या कंपनीचे उत्पादन ठप्प झाले होते. अन्य सहा कंपन्या दिवसाला ३० हजार इंजेक्शन बनवितात. या कंपन्यांकडूनेखील महाराष्ट्राला पुरवठा होतो. मात्र, आज दिवसभरात एकही रेमडेसीवीर इंजेक्शन महाराष्ट्राला मिळालेले नाहीय. (No Single Remdesivir given to Maharashtra today.)

पुण्यात जी लस उपलब्ध झालीय ती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आपल्या पातळीवर मिळविलेली आहेत. पुण्यासाठी रेमडेसिविर उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन सतत प्रयत्नशील असून रात्री उशिरापर्यंत दिल्ली येथून थेट विशेष फ्लाईटने काही प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पुण्यात येणार होता. मात्र तो आज दुपारी दाखल झाला.  

कोणकोणत्या कंपन्या हे इंजेक्शन बनवितात...

हेट्रो ड्रग्ज, झायडस कॅडिला, सिप्ला, डॉ. रेड्डीज, व्हायट्रीस, बायोकॉनची उपकंपनी सिंजीन इंटरनॅशनल आणि ज्युबिलंट फार्मोव्हा या सात कंपन्या रेमडेसीवीर इंजेक्शन बनवितात. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सmedicineऔषधंcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस