बैसाखी उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम
By Admin | Updated: April 15, 2015 00:03 IST2015-04-15T00:03:31+5:302015-04-15T00:03:31+5:30
अहमदनगर : शहरातील गोविंदपुरा येथील गुरुद्वारामध्ये ३१६ व्या बैसाखी उत्सवानिमित्त मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी भाई हरजुटसिंगजी आनंदपूरवाले यांचे कीर्तन झाले़

बैसाखी उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम
अ मदनगर : शहरातील गोविंदपुरा येथील गुरुद्वारामध्ये ३१६ व्या बैसाखी उत्सवानिमित्त मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी भाई हरजुटसिंगजी आनंदपूरवाले यांचे कीर्तन झाले़ बैसाखीनिमित्त गुरुद्वारा येथे गेल्या चार दिवसांपासून धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रभातफेरी व भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते़ भाविकांना उपदेश करताना आनंदपूरवाले म्हणाले की, आजच्या दिवशी शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंगजी यांनी शीखांना एक विशिष्ट रुप दिले़ अमृतपान करून केस, कडा, कंगवा कच्छा व कीरपान परिधान केल्यानेच शीख संपूर्ण होईल. दुर्बलांचे रक्षण करावे, अशी शीख समाजाची शिकवण असून, यानुसार सर्वांनी मार्गक्रमण करावे असे ते म्हणाले़ यावेळी आमदार संग्राम जगताप, इंदरसिंग धुप्पड, कर्तारसिंग नारंग, गुरुद्यालसिंग वाही, संभाजी कदम, हरजितसिंग वधवा यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते़