धर्म मस्ट
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:18+5:302015-01-29T23:17:18+5:30
फोटो आहे

धर्म मस्ट
फ टो आहेटिमकीतील सेवा समितीतर्फे गजानन विजयग्रंथाचे पारायणनागपूर : श्री संत गजानन महाराज सेवा समिती, तीन खंबा चौक टिमकीच्या वतीने श्री गजानन विजयग्रंथाचे पारायण करण्यात आले. सी. ए. रोडवरील रेणुका माता मंदिरात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मीनाक्षी पेशवे होत्या. सकाळी १० वाजता पारायण, १२ वाजता आरती, सत्संग पार पडला. यावेळी मीनाक्षी पेशवे म्हणाल्या, आज मुलांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार करणे गरजेचे आहे तरच भविष्यात ते चांगली प्रगती करू शकतील. महिलांनी आपला वेळ टीव्ही मालिका पाहण्यात न गमावता मुलांवर चांगले संस्कार कसे करता येतील, याकडे लक्ष द्यावे. यावेळी सौभाग्यवती महिलांना श्रीमद्भगवद्गीता देण्यात आल्या. समितीप्रमुख अनुप गुप्ता यांनी भगवद्गीतेचा एक अध्याय जरी प्रत्येकांनी वाचला तर आत्मिक समाधान मिळते, असे विचार व्यक्त केले. मंगला आकरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी समितीचे प्रचारप्रमुख श्याम गडवे व सदस्यांनी पुढाकार घेतला.