शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींना दिलासा, अमित शाहांवर केलेली वादग्रस्त टीका, सुप्रीम कोर्टाची खटल्याला स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:24 IST

Rahul Gandhi: एका सभेत राहुल गांधींनी अमित शाहांवर वादग्रस्त टीका केली होती.

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरोधात रांचीच्या कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शाहांना खुनी म्हटल्याबद्दल राहुल गांधींविरोधात 2018 मध्ये भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला संपवण्यासाठी राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने झारखंड सरकार आणि तक्रारदाराला नोटीस बजावली आहे.

झारखंड हायकोर्टाने केस रद्द करण्यास दिलेला नकार 

'भाजप हा असा पक्ष आहे,  ज्याचे नेते खुन्याला पक्षाध्यक्ष म्हणून स्वीकारतात', असे विधान राहुल गांधींनी 2018 मध्ये केले होते. या वक्तव्यामुळे दुखावलेले भाजप कार्यकर्ते नवीन झा यांनी रांची कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला आहे. न्यायालयाने राहुल गांधींना हजर राहण्यासाठी समन्सही बजावले होते. हे प्रकरण रद्द करण्यासाठी राहुल गांधींनी झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर या आदेशाला राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

न्यायालयात युक्तिवादहे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्यासमोर आले. आज(20 जानेवारी) राहुल गांधींच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, नवीन झा ज्यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे, ते थेट प्रभावित झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्या वतीने याचिका दाखल करण्याचे कोणतेही औचित्य नाही. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने झारखंड सरकार आणि तक्रारदार नवीन झा यांना नोटीस बजावली. न्यायालयाने त्यांना चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास सांगितले. ते जे उत्तर दाखल करतील, त्यावर राहुल गांधी दोन आठवड्यांत उत्तर दाखल करतील. सुप्रीम कोर्ट 6 आठवड्यांनंतर पुढील सुनावणी करणार आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयJharkhandझारखंडAmit Shahअमित शाह