शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, कोल्हापूरच्या पूर संकटाला दिलासा; कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास केंद्रीय जल आयोगाचा नकार

By अशोक डोंबाळे | Updated: January 30, 2026 13:48 IST

अलमट्टी धरणाला राष्ट्रीय दर्जा नाकारला

अशोक डोंबाळेसांगली : कर्नाटकातील कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला नव्हे तर दुरुस्तीला परवानगी दिली आहे, असा खुलासा केंद्रीय जल आयोगाने केला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना भेडसावणाऱ्या पुराच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटकातील अलमट्टी धरणाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यास आणि त्याची उंची वाढवण्यास केंद्रीय जल आयोगाने नकार दिला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांसाठी दिलासा मिळाला आहे.सांगलीतील ॲड. विश्राम कदम यांनी केंद्रीय जल आयोगाकडे एका पत्राद्वारे अलमट्टी धरणाला राष्ट्रीय दर्जा दिला आहे का? आणि उंची वाढविण्यास मंजुरी दिली आहे का? अशी विचारणा केली होती. केंद्रीय जल आयोगाने ॲड. कदम यांना २६ जानेवारी २०२६ रोजी लेखी पत्रव्यवहार करून खुलासा केला आहे.यामध्ये म्हटले की, केंद्र शासनाने २००८ मध्ये १६ प्रकल्पांना राष्ट्रीय दर्जा दिला. यामध्ये अलमट्टी धरणाचा समावेश नाही. अलमट्टी धरणाला या योजनेंतर्गत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक पात्रता पूर्ण करावी लागतील. यात गुंतवणूक मंजुरी, निधी उपलब्धता आणि सरकारी प्राधान्यक्रम यांचा समावेश आहे. कर्नाटक सरकारने केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयाकडे असा कोणताही प्रस्ताव दिला नाही.दुसरीकडे, धरणाची उंची, साठवण क्षमता किंवा संबंधित कामांमध्ये वाढ करण्यासही केंद्रीय जल आयोगाने पूर्णपणे नकार दिला आहे. धरणांच्या सुरक्षिततेसाठी राबवल्या जाणाऱ्या धरण पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्पाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात कर्नाटक राज्य सहभागी आहे. या टप्प्यात कर्नाटक जलसंपदा विभागाने १८ धरणांच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव दिला असून यामध्ये अलमट्टी धरणाचा समावेश आहे. मात्र, या मंजूर प्रस्तावात धरणाची उंची वाढवण्याशी संबंधित कोणतेही काम प्रस्तावित नाही. हे पुनर्वसन केवळ भौतिक सुधारणांसाठी आहे, जसे की सुरक्षितता वाढवणे आणि कार्य प्रदर्शन सुधारणे.अप्पर कृष्णा प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याबाबत ही सीडब्ल्यूसीने कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकल्पाचा विस्तृत अहवाल १६ मार्च २०२१ रोजी प्राप्त झाला, ज्यात अलमट्टी धरणाची उंची ५१९.६० मीटरवरून ५२४.२६ मीटरपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे अतिरिक्त १३० टीएमसी पाण्याचा साठा आणि वापर शक्य होईल, असा दावा आहे. मात्र, कृष्णा जल वाटप लवादाच्या दुसऱ्या निर्णय (केडब्ल्यूडीटी-२) अद्याप प्रभावी नसल्याने, हा प्रस्ताव आंतरराज्यीय दृष्टिकोनातून अस्वीकार्य आहे, असे सीडब्ल्यूसीच्या आंतरराज्यीय बाबी संचालनालयाने १८ मे २०२१ रोजीच्या पत्रात नमूद केले आहे.

अलमट्टी धरणाची उंची वाढणार नाही : विश्राम कदमसीडब्ल्यूसीचे संचालक अनंत कुमार गुप्ता यांनी हे उत्तर मुख्य अभियंत्याच्या मान्यतेने २६ जानेवारी २०२६ रोजी दिले आहे. यामध्ये अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यात येणार नाही. केवळ धरणाच्या दुरुस्तीला जल आयोगाने परवानगी दिली आहे. तसेच धरणाला राष्ट्रीय दर्जाही दिलेला नाही, असेही उत्तर दिले आहे, अशी माहिती ॲड. विश्राम कदम यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Relief: Central Water Commission Rejects Almatti Dam Height Increase

Web Summary : Central Water Commission denied national project status and height increase for Almatti Dam, benefiting flood-affected Sangli, Kolhapur. Only repairs approved. Krishna Water Disputes Tribunal-2 decision pending.