अशोक चव्हाणांना दिलासा
By Admin | Updated: August 14, 2014 03:40 IST2014-08-14T03:40:47+5:302014-08-14T03:40:47+5:30
अशोक चव्हाण यांनी २००९ च्या विधानसभा निवडणूक खर्चाचा दिलेला हिशेब योग्य नसल्याने त्यांना अपात्र का घोषित करण्यात येऊ नये

अशोक चव्हाणांना दिलासा
नवी दिल्ली : पेड न्यूजसंदर्भात निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीला दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला़
अशोक चव्हाण यांनी २००९ च्या विधानसभा निवडणूक खर्चाचा दिलेला हिशेब योग्य नसल्याने त्यांना अपात्र का घोषित करण्यात येऊ नये, अशी नोटीस निवडणूक आयोगाने बजावली होती़ दिल्ली उच्च न्यायालयाने मात्र या नोटिसीला स्थगिती दिली होती़ या स्थगितीविरोधात माधव किन्हाळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती़ आज हे प्रकरण सुनावणीस आले़