शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

Coronavirus : वेगवान चाचणीसाठी Reliance नं खरेदी केलं इस्रायलकडून तंत्रज्ञान; मागितली भारतात आणण्याची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 08:20 IST

Coronavirus In India Reliance Technology : सध्या देशात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. रिलायन्सनं वेगवान चाचणीसाठी खरेदी केलं इस्रायलकडून तंत्रज्ञान.

ठळक मुद्देसध्या देशात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद.रिलायन्सनं वेगवान चाचणीसाठी खरेदी केलं इस्रायलकडून तंत्रज्ञान.

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत सध्या देशात आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येताना दिसत आहे. दरम्यान, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण जितकं महत्त्वाचं आहे तितकंचं बाधितांची ओळख पटवण्यासाठी चाचण्याही होणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजनं (Reliance Industries) इस्रायलयच्या तज्ज्ञांना भारतात येण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. तज्ज्ञांची ही टीम कोविड-१९ ची (Covid-19) त्वरित ओळख पटवणारी उपकरणं भारतात स्थापित करतील. रिलायन्सनं ही प्राणाली इस्रायलच्या एका स्टार्टअपकडून दीड कोटी डॉलर्सला खरेदी केली आहे. कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रेथ ऑफ हेल्थच्या (BOH) एका शिष्टमंडळाला रिलायन्सच्या मागणीनंतर आपात्कालिन परिस्थितीत मंजुरी देण्यात आली आहे. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. इस्रायलच्या या कंपनीच्या तज्ज्ञांची टीम भारतातील रिलायन्सच्या टीमला आपल्या प्रणालीबाबत प्रशिक्षण देतील. या प्रणालीद्वारे कोरोनाबाधित लोकांची आणि रूग्णांची सुरूवातीच्या टप्प्यातच ओळख पटवता येईल. ही नवी प्रणाली अवघ्या काही सेकंदाची याची माहिती देते. संक्रमण शोधण्यात अधिक यशस्वी  रिलायन्सनं जानेवारी २०२१ मध्ये ब्रीथ ऑफ हेल्थ सोबत १.५ कोटी डॉलर्सचा करार केला होता. त्यानंतर रिलायन्सला स्विफ्ट कोविड १९ ब्रीथ टेस्टिंग सिस्टम मिळतील. याअंतर्गत रिलायन्स इस्रायलच्या कंपनीकडून थेट कोरोना व्हायरस टेस्ट किट खरेदी करेली. या अंतर्गत रिलायन्स मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या करू शकेल. दरम्यान, महिन्याला एक कोटी डॉलर्स खर्च करून लाखो लोकांच्या चाचण्याही करणं याद्वारे शक्य आहे. बीओएचनं  श्वासोच्छ्वासाद्वारे चाचणी करण्याचं हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. याचं यशस्वी चाचणी करण्याचं प्रमाण ९५ टक्के असल्याचं सांगण्यात आलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतRelianceरिलायन्सMukesh Ambaniमुकेश अंबानीIsraelइस्रायल