शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
2
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
3
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
4
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
6
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
7
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
8
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
9
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
10
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
12
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
13
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
14
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
15
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
16
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
17
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
18
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
19
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
20
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार

Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 14:33 IST

जिओ कमी किंमतीचे हँडसेट डेटा पॅकसह विकणार आहे. नजीकच्या काळात रिलायन्सने याबाबतची हिंट दिली होती. कंपनी लवकरच कमी किंमतीचे अँड्रॉईड फोन विकणार आहे, असे म्हटले होते. 

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची टेलिकॉम कंपनी Reliance Jio भारतात कमी किंमतीचे फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्टनुसार Reliance Jio डिसेंबरपर्यंत अँड्रॉईड प्लॅटफॉर्मचे हँडसेट भारतीय बाजारात आणणार आहे. 

बिझनेस स्टँडर्डने याचे वृत्त दिले आहे. जिओ कमी किंमतीचे हँडसेट डेटा पॅकसह विकणार आहे. नजीकच्या काळात रिलायन्सने याबाबतची हिंट दिली होती. कंपनी लवकरच कमी किंमतीचे अँड्रॉईड फोन विकणार आहे, असे म्हटले होते. 

रिलायन्स इंडस्ट्रीने गुगलसोबत करार केली आहे. जुलैमध्ये कंपनीने सांगितले होते की, गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट रिलायन्सच्या डिजिटल युनिटमध्ये 4.5 अब्ज डॉलर गुंतविणार आहे. यावेळी रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सांगितले होते की, गुगल कमी किंमतीचे 4G/5G स्मार्टफोनसाठी अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम तयार करत आहे. रिलायन्स डिझाईन करणार आहे. 

रिपोर्टनुसार रिलायन्स जिओ गुगलच्या नव्या प्लॅटफॉर्मवर असलेले 1 कोटी कमी किंमतीचे स्मार्टफोन बाहेरून बनवून घेऊ शकते. बिझनेस स्टँडर्डला सुत्रांनी ही माहिती दिली आहे. हे कमी किंमतीचे स्मार्टफोन एकतर डिसेंबरमध्ये लाँच होतील किंवा 2021 च्या सुरुवातीला लाँच केले जातील. भारतातील बाजारावर सध्या चिनी कंपन्यांचा पगडा आहे. यामध्ये शाओमी, व्हिवो, ओप्पो, वन प्लस आणि रिअलमी या कंपन्या आहेत. जिओच्या या पावलामुळे चिनी कंपन्यांना तगडी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. 

जिओचे प्लॅन्सरिलायन्स जिओचा सर्वाधिक परवडणारा प्लॅन 199 रुपयांचा आहे. यामध्ये रोज 1.5 जीबी डेटा मिळतो. याची वैधता 28 दिवसांची आहे. याशिवाय एक्स्ट्रा 99 रुपये दिल्यावर Jio Prime मेंबरशिप मिळते. डेटासह जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर 1000 मिनिट दिले जात आहेत. तसेच 100 एसएमएस पाठविता येणार आहेत. 

दुसरा प्लॅन 249 रुपयांचा असून त्यामध्ये रोज 2 जीबी डेटा दिला जात आहे. तसेच व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. अन्य सुविधा 199 प्लॅन सारख्याच आहेत. तिसरा प्लॅन 349 रुपयांचा आहे. रोज 3 जीबी डेटा दिला जातो. यामध्ये मोफत कॉलिंग, एसएमएस सारखे फायदे आहेत. नव्या ऑफरनुसार 5 महिने मोफत डेटा, अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. 

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओindia china faceoffभारत-चीन तणावchinaचीनMobileमोबाइल