शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कॉर्पोरेट शेतीसाठी जमीन खरेदीची रिलायन्सची योजना नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 05:50 IST

कृषी आंदोलनाबाबत जिओने उच्च न्यायालयात दाखल याचिकेत स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कॉर्पोरेट शेतीसाठी पंजाब-हरियाणा अथवा देशात इतरत्र कोठेही जमीन खरेदी करण्याचा आमचा इरादा नसल्याचा खुलासा मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स उद्योग समूहाने केला आहे. तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी रिलायन्स उद्योग समूहाला लक्ष्य केल्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी जिओ इन्फोकॉमने पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यात हे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.

तीन कृषी कायद्यांचा मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासारख्या बड्या उद्योगपतींना फायदा होणार असून, ते शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करतील, अशी धारणा शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी या कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. आंदोलक शेतकरी या कंपन्यांविरोधात राग व्यक्त करीत आहेत. पंजाबातील रिलायन्स जिओच्या १,५०० पेक्षा अधिक दूरसंचार टॉवरांची आंदोलकांनी मोडतोड केली आहे. कृषी कायदे हे जिओला अनुकूल बनविण्यात आल्याचा आंदोलकांचा समज असून, त्यामुळे त्यांनी जिओवर बहिष्कार टाकला आहे.रिलायन्स आणि तिच्या कोणत्याही उपकंपनीने पंजाब, हरियाणा अथवा देशात इतरत्र कॉर्पोरेट अथवा कंत्राटी शेतीसाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या जमीन खरेदी केलेली नाही. भविष्यातही आमची अशी काही योजना नाही.

कंपनीने म्हटले की, आपल्या टॉवरांच्या हानीची सरकारने दखल घ्यावी. हिंसेमुळे आमच्या हजारो कर्मचाऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. आवश्यक प्रवास, विक्री आणि सेवा यांत बाधा निर्माण झाली आहे.

नाव जोडले गेल्याने प्रतिष्ठा झाली कमीरिलायन्सने म्हटले की, कृषी कायद्यांशी आमचा कोणताही संबंध नाही. या कायद्यांशी आमचे नाव जोडून आमचा व्यवसाय आणि प्रतिष्ठेचे नुकसान केले जात आहे. या कायद्यांचा कंपनीला कोणत्याही प्रकारचा लाभ नाही. रिलायन्स रिटेल आणि जिओ इन्फोकॉम यांच्याशी संबंधित कोणतीही कंपनी ‘कॉर्पोरेट’ अथवा ‘कंत्राटी’ शेती करीत नाही. नजीकच्या भविष्यातही कंपनीचा असा कोणताही इरादा नाही.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीReliance Jioरिलायन्स जिओ