शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

काैटुंबिक वारसा पुढे चालवण्यासाठी नेत्यांचे नातेवाईक मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 06:50 IST

या राज्यात ‘फॅमिली फॅक्टर’चा बोलबाला

मनोज भिवगडे

रांची : झारखंडच्या राजकीय क्षेत्रात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने परिवारवाद उफाळून आला आहे. ‘फॅमिली फॅक्टर’च्या मुद्याने झारखंडचे राजकीय क्षेत्र ढवळून निघत असून, सोरेन कुटुंबासह सर्वच राजकीय पक्षांतील प्रमुख नेत्यांचे वारसदार कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन यांचे कुटुंब वारसा हक्क चालविण्यात आघाडीवर आहे. दुमका लोकसभा मतदासंघातून आठ वेळा खासदार राहिल्याने सोरेने यांच्या कुटुंबाने या मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. येथून त्यांची मोठी सून सीता सोरेन भाजपच्या उमेदवार आहेत. त्यांचा सामना काका व झामुमोचे नलिन सोरेन यांच्यासोबत होणार आहे. 

यांनीही चालविला वारसा, कुठे जावई तर कुठे सासरे रिंगणात

काँग्रेस व झारखंड विकास मोर्चाचे नेते ब्रजकिशोर जयसवाल यांचा मुलगा मनीष जयसवाल हजारीबाग येथून काँग्रेसचे उमेदवार आहेत.हजारीबाग येथून काँग्रेसचे उमेदवार असलेले जयप्रकाश पटेल हे मांडू येथून पाच वेळा आमदार व गिरीडीह येथून खासदार राहिलेले टेकलाल मेहता यांचा मुलगा आहे. जयप्रकाश पटेल यांचे सासरे मथुरा महतो हे गिरीडीह येथून झामुमोचे उमेदवार आहेत. एकीकडे जावई काँग्रेसकडून, तर सासरे झामुमोकडून शेजारी मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.सिंहभूमी येथून माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या पत्नी गीता या भाजपच्या 

उमेदवार आहेत.nकाँग्रेसने खुंटी लोकसभा मतदारसंघात कालिचरण मुंडा यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते स्व. टी. मुचिराय मुंडा यांचे ते पुत्र आहेत.nझामुमोने विद्यमान खा. विजय हांसदा यांना राजमहल येथून पुन्हा रिंगणात उतरविले आहे. ते वडील थाॅमस हांसदा यांचा वारसा पुढे चालवीत आहेत.nकेंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी या पती रमेश यादव यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा पुढे चालवीत आहेत. भाजपने त्यांना कोडरमा येथून प्रथम २०१९ मध्ये उमेदवारी दिली होती.

‘सत्ताधारी जेल में, अटके हैं बेल में’nहेमंत सोरेन यांच्यावर झालेली ईडीची कारवाई व त्यांची कारागृहात झालेली रवानगी सध्या प्रचाराचा मुद्दा झाला आहे.nपरिवारवादासोबतच सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर प्रहार करीत विरोधी पक्षांनी ‘सत्ताधारी जेल में, अटके हैं बेल में’ दिलेला हा नारा चांगलाच गाजतो आहे.

टॅग्स :Jharkhandझारखंडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक