नातेवाईकांकडून महिलेच्या खुनाचा प्रयत्न
By Admin | Updated: April 4, 2015 01:54 IST2015-04-04T01:54:59+5:302015-04-04T01:54:59+5:30
पुणे : बांधकामावरुन नातेवाईकांमध्ये झालेल्या भांडणामधून दुचाकीवरुन जात असलेल्या एका महिलेला मोटारीची धडक देऊन तिच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बाणेर स्मशान भुमी रस्त्यावर ३० मार्च रोजी घडली होती.

नातेवाईकांकडून महिलेच्या खुनाचा प्रयत्न
प णे : बांधकामावरुन नातेवाईकांमध्ये झालेल्या भांडणामधून दुचाकीवरुन जात असलेल्या एका महिलेला मोटारीची धडक देऊन तिच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बाणेर स्मशान भुमी रस्त्यावर ३० मार्च रोजी घडली होती.प्रभावती वाडकर (वय ४५, रा. बाणेर गाव) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मोनिका सचिन वाडकर, सचिन बाळकृष्ण वाडकर, किसन रामभाऊ वाडकर, छाया किसन वाडकर, समिर किसन वाडकर (सर्व रा. राम मंदिराजवळ, बाणेर गाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी आणि आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यामध्ये बांधकामावरुन आपसात भांडणे आहेत. या वादामधून त्यांच्या नातेवाईकांनी २० मार्च रोजी प्रभावती यांना दमदाटी केली होती. याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली होती.त्याचा राग नातेवाईकांच्या मनात होता. ३० मार्च रोजी प्रभावती त्यांच्या दुचाकीवरुन जात होत्या. त्यावेळी नातेवाईकांनी मोटारीमधून येऊन त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यांना ठार मारण्याच्या उद्देशानेच हा अपघात घडवून आणल्याची तक्रार प्रभावती त्यांनी दिली आहे. गंभीर जखमी झालेल्या प्रभावती यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.