सफाई कामगार भरतीस आयुक्तांचा नकार महापालिका : संघटनेला दिला न्यायालयात जाण्याचा सल्ला
By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:02+5:302015-03-08T00:31:02+5:30
नाशिक : महापालिकेत सफाई कामगार भरतीस महापालिका आयुक्तांनी स्वच्छ शब्दात नकार दिला आहे. भरती करू नका, हे शासनाचेच धोरण असल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी भरतीसाठी आंदोलने करणार्या कामगारांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.

सफाई कामगार भरतीस आयुक्तांचा नकार महापालिका : संघटनेला दिला न्यायालयात जाण्याचा सल्ला
न शिक : महापालिकेत सफाई कामगार भरतीस महापालिका आयुक्तांनी स्वच्छ शब्दात नकार दिला आहे. भरती करू नका, हे शासनाचेच धोरण असल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी भरतीसाठी आंदोलने करणार्या कामगारांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. महापालिकेत कुंभमेळ्याची पूर्वतयारी सुरू आहे. कुंभमेळ्यात नोकर भरती करावी, यासाठी विविध संघटनांकडून प्रयत्न सुरू होते. दोन दिवसांपूर्वी सफाई कामगारांची भरती करावी, तसेच स्वच्छतेच्या कामाचे आऊटसोर्सिंगचे काम करण्यास विरोध करताना हे काम सफाई कामगारांकडून करून घ्यावे, अशा आशयाची मागणी करीत आंदोलन केले होते. परंतु आयुक्त डॉ. प्रवीणकुमार गेडाम यांनी या शिष्टमंडळाला नकार दिला. शनिवारी पत्रकारांशी बोलताना डॉ. गेडाम यांनी सांगितले की, महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे भरती न करता आऊटसोर्सिंग करून कामे करून घ्यावीत, हे शासनाचेच धोरण आहे. त्यातच महापालिकेला कुंभमेळ्याच्या कालावधीत कधी काही कामगार नऊ दिवस, तर काही ९० दिवस कर्मचार्यांची गरज आहे. इतक्या अल्पकाळासाठी कामगारांची भरती करून अन्य वेळी काय करणार, असा प्रश्न त्यांनी केला. त्याचप्रमाणे आऊटसोर्सिंग करताना संबंधित ठेकेदारावर स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी टाकण्यात येणार असून, ठेकेदाराला जबाबदार धरून कारवाई करता येईल, असेही त्यांनी सांगितले. आंदोलन करणार्या कर्मचारी संघटनेला आपण नकार दिल्यानंतर त्यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. तथापि, कर्मचारी भरती होऊच शकत नसल्याने न्यायालयात जाऊ शकता, असेही सांगितल्याचे गेडाम म्हणाले.महापालिकेतील अन्य रिक्त पदे केवळ आस्थापना खर्च मर्यादेपेक्षा अधिक असल्याने भरता येणार नाही, आवश्यक पदे तरी वेळेत भरता यावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून त्यानुसार पाठपुरावा सुरू असल्याचेही ते म्हणाले...इन्फो...अतिरिक्त आयुक्तपदासाठी सारेच अपात्रमहापालिकेत अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे मंजूर आहेत. शासनाने एका अधिकार्याची प्रतिनियुुक्तीवर झाली आहे, तर दुसर्या रिक्त पदासाठी पालिकेत सध्या तरी पात्रता धारण करणारे अधिकारी नसल्यामुळे तूर्तास प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठविण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येत आहे. नवीन अधिकार्याचा कार्यकाल पूर्ण होईपर्यंत अनेक अधिकारी पात्रतेच्या अटी पूर्ण करू शकतील, असेही त्यांनी सांगितले.