शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

विमान प्रवासासाठी आली नियमावली; प्राधिकरणाने जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 06:00 IST

सर्व खबरदारी घेत विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) गुरुवारी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याअंतर्गत विमानतळ टर्मिनल इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांना थर्मल चेक मशीनमधून जाणे बंधनकारक असेल.

नवी दिल्ली : कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं असून, भारताला त्याचा फटका बसला आहे. कोरोनाच्या संकटापायी देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरूअसून, सर्वच उद्योगधंदे ठप्प आहेत. रेल्वे आणि विमानसेवाही बंद आहे. पण केंद्र सरकारनं आता २५ मेपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच तिकीटांचेदरही निश्चित केले आहेत. त्यानुसार ४० मिनिटांपेक्षा कमी प्रवासासाठी दोन हजार ते जास्तीत जास्त सहा हजार, १८० मिनिटे ते २१० मिनिटांदरम्यानच्या प्रवासासाठी ६,५०० ते १८,६०० असे दर असतील.सर्व खबरदारी घेत विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) गुरुवारी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याअंतर्गत विमानतळ टर्मिनल इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांना थर्मल चेक मशीनमधून जाणे बंधनकारक असेल. तसेच प्रवाशांनी त्यांच्या मोबाईलवर आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करून ठेवणे बंधनकारक केले आहे. विमानतळावर जाण्यापूर्वी अशा काही गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाच्या आहेत.नागरी उड्डयन मंत्री म्हणाले की, उड्डाणे कमी होऊ शकतात, विमानातील काही जागा रिक्त ठेवून उड्डाण करणं व्यावहारिक ठरणार नाही, कारण यामुळे तिकिटांच्या किमती वाढतील. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं असून, २५ मार्चपासून देशातील सर्व व्यावसायिक प्रवासी उड्डाणे बंद करण्यातआली आहेत.स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. हा निर्णय देशातील सर्वांगीण आर्थिक वातावरणाला बळकटी देण्यासाठी दूरगामी सिद्ध होईल. आॅपरेशन पुन्हा सुरू करण्यासाठी एसओपी आणि उड्डाणांच्या तपशिलांची अद्याप प्रतीक्षा आहे.हवाई प्रवासाचे तिकीटदर निश्चित : हरदीपसिंह पुरीकोरोना संकटाच्या काळात विमान कंपन्यांकडून प्रवाशांची लूट होऊ नये यासाठी तीन महिन्यांसाठी हे कमाल किमान दर निश्चित करण्यात आले आहेत. दिल्ली आणि मुंबई ९० ते १२० मिनिटांच्या विमान प्रवासासाठी कमीतकमी ३५०० रुपये आणि जास्तीतजास्त १० हजार रुपये असणार आहे. हे दर २४ आॅगस्टपर्यंत हे लागू राहणार असल्याची माहिती हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली. हरदीपसिंग पुरी म्हणाले की, देशांतर्गत वाहतूक सेवेच्या अनुभवावरच आम्ही आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा विचार करणार असल्याचे हरदीपसिंग पुरी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच विमान वाहतूक सुरू झाल्यानंतर मेट्रो ते मेट्रो शहरांसाठी स्वतंत्र नियम आणि नॉन मेट्रो शहरांसाठी वेगळे नियम असणार आहेत.सध्या प्रवासाच्या वेळेनुसारसात प्रकार निश्चित करण्यातआले आहेत.- ४0 मिनिटांपेक्षा कमी वेळ- ४0 ते ६0 मिनिटं- ६0 ते ९0 मिनिट- ९0 ते १२0 मिनिट- १२0 ते १५0 मिनिटं- १५0 ते १८0 मिनिटं- १८0 ते २१0 मिनिटंमार्गदर्शन सूचना- प्रवाशांनी विमान सुटण्याच्या वेळेच्या दोन तास आधी पोहोचले पाहिजे.- ज्यांची उड्डाणे चार तासांच्या आत असतील, त्या प्रवाशांना टर्मिनल इमारतीत जाण्याची परवानगी देण्यात येईल.- सर्व प्रवाशांनी मास्क आणि हातमोजे घालणे आवश्यक आहे.- प्रवाशांना थर्मल स्क्रीनिंग करावी लागणार आहे.- प्रवाशांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असणे महत्त्वाचे आहे.- ज्यांच्याकडे 'ग्रीन' पर्याय नसेल किंवा शासकीय संपर्क ट्रेसिंग अ‍ॅप नसेल तर त्यांना प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही.- विशिष्ट कारणांशिवाय प्रवाशांच्या ट्रॉलीला मंजुरी दिली जाणार नाही. तिचे निर्जंतुकीकरण करावे लागेल.- राज्य सरकार आणि प्रशासनाने प्रवासी आणि एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतूक आणि खासगी टॅक्सी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.- खासगी वाहने किंवा निवडक कॅब सेवांना प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना विमानतळावर नेण्याची परवानगी असेल.

टॅग्स :airplaneविमानcorona virusकोरोना वायरस बातम्या