शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून प्रियकरानं वडिलांच्य साह्यानं महिलेला जाळले जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 21:06 IST

लग्नाची मागणी फेटाळून लावली म्हणून संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बांसवाडा - लग्नाची मागणी फेटाळून लावली म्हणून संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम आणि लग्न या प्रत्येकाच्या आयुष्यतील महत्वाच्या गोष्टी असतात. लग्न म्हणजे नेमकं काय असतं...? ते केवळ कर्तव्यबंधन नसतं तर , दोन मनांचं अतूट बंधन असतं. लग्नात दोन मन जुळली जातात. मात्र राज्यस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यात लग्नासाठी नकार दिला म्हणून प्रियकरानं तिला चक्क जाळल्याची धक्कादायक घटना घडली. या कुकर्ममध्ये प्रियकराला त्याच्या वडिलांनी साथ दिली.

बाप आणि मुलानी मिळून त्या मुलीला जिंवत जाण्याचा प्रयत्न केला.  सीमा यादव असे या पीडितेचे नाव आहे. तिच्यावर सध्या उदयपूरच्या रूग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी सीमाचा प्रियकर रवी यादव, त्याचे वडिल चंदू यादव आणि आई गंगा यादव या तिघांनाही अटक करण्यात आली. काल रविवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली. 

या तिघांनी रस्त्यावर बेदाम मारहाण केली. तसेच आपल्या अंगावर रॉकेल ओतले आणि पेटवून दिले असा कबुली जबाब पीडित महिलेने दिला. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्यावर  हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणात गुन्हाही नोंदवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. माध्यमांच्या वृत्तानुसार, सध्या सीमाची प्रकृती चिंताजनक असून, ती जगेल की नाही हे देखील सांगता येत नाही.  

फक्त लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून महिलेला जाळण्यात आले.  या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. देशातील महिला सुरक्षित नाहीत हे अशा घटनांमधून वारंवार समोर येत आहे. दरम्यान, आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी सीमा यादवच्या कुटुंबाने पोलिसांकडे केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस