टीकाकारांकडे दुर्लक्ष करून त्यांचेही साहित्य वाचा

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:16+5:302015-02-14T23:52:16+5:30

सदानंद मोरे : प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार

Regardless of the critics, read their literature too | टीकाकारांकडे दुर्लक्ष करून त्यांचेही साहित्य वाचा

टीकाकारांकडे दुर्लक्ष करून त्यांचेही साहित्य वाचा

ानंद मोरे : प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार
नाशिक : साहित्य संमेलन हे चर्चेचे व्यासपीठ आहे. त्यातून नव साहित्यिकांना प्रेरणा मिळते आणि साहित्याच्या दिशेवर चर्चा होते. त्यामुळे त्यावर कोणी काय भाष्य करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे. त्यामुळे टीकाकारांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून त्यांचेही साहित्य वाचत राहा असा सल्ला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी दिला.
घुमान येथे होणार्‍या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नाशिकच्या वारकरी मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, साहित्य संमेलनात विविध विषयांवर चर्चा होते. त्यातून भविष्यविषयक निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे सापडत असतात. त्या मार्गदर्शक सूत्रांमधून पुढील काम सुरू असते. आधुनिक काळात सोशल मीडियावर साहित्य येत असताना त्यापासून संत साहित्यही दूर नाही. सामान्य लोकांना समजेल अशा स्वरूपात ज्ञानेश्वरी, गाथा इंटरनेटवर आली असून, त्याच्या सीडीही तयार झाल्याने आधुनिक काळात संतसाहित्य मागे नसल्याचे ते म्हणाले.
राजकीय हस्तक्षेपाबाबत बोलताना ते म्हणाले की, साहित्य विश्वातले लोक अजून दुर्गा भागवत यांच्या छायेतून बाहेर आलेले नाहीत. आता त्यांनी त्यातून बाहेर येऊन विचार करावा. मराठी साहित्य संमेलन राज्याबाहेर होत असल्याने त्यावर टीका करण्याऐवजी आता खरे मराठी साहित्याला भारतीय साहित्याचे स्वरूप प्राप्त होत असून, आपल्या पूर्वजांनी राज्याबाहेर काय सहभाग दिला आहे. याचा शोध घ्याचा प्रयत्न करायचा असेल संमेलनाला व्यापक अवकाश प्राप्त झाले पाहिजे. त्यासाठी सरहद संस्थेला आणि आयोजकांना धन्यवाद दिले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

Web Title: Regardless of the critics, read their literature too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.