शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जैन मुनींच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्यास नकार, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 17:07 IST

चौकशीतील प्रगतीबद्दल पोलिसांची प्रशंसा

हुबळी (कर्नाटक) : बेळगाव जिल्ह्यातील जैन मुनींच्या हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यास कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सोमवारी नकार दिला. त्याचबरोबर त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीतील प्रगतीबद्दल पोलिसांची प्रशंसा केली आहे. नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी कामकुमार नंदी महाराज यांची चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावात हत्या करून त्यांचा मृतदेह रायबाग तालुक्यातील खटकभावी गावातील बोअरवेलमध्ये टाकण्यात आला होता.‘अशा बाबतीत कोणीही राजकारण किंवा भेदभाव करणार नाही,’ असे परमेश्वरा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तक्रार नोंदवून आरोपींना अटक केली. बोअरवेलमध्ये टाकलेले मृतदेहाचे तुकडेही हस्तगत केले आहेत. जलद कारवाईसाठी मी पोलिसांचे कौतुक करतो, असे ते म्हणाले.जैन संत वरुरु गुणाधर नंदी महाराज यांची भेटया घटनेच्या निषेधार्थ हुबळी येथे आंदोलन करणारे जैन संत वरुरु गुणाधर नंदी महाराज यांची आपण भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. मी त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या व अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांना दिले, असेही गृहमंत्री म्हणाले. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘पोलिस खाते सक्षम असून, आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण सध्या सीबीआय किंवा इतर तपास यंत्रणांकडे सोपवण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असून, तपास पूर्ण झाल्यानंतर सत्य समोर येईल.’

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावCrime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटक