शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
2
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
3
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
4
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
5
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
6
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
7
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
8
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
9
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
10
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
11
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
12
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
13
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
14
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
15
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
16
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
17
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
18
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
19
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
20
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!

पीएफवरील व्याजदरात कपात; नवा व्याजदर ८.१ टक्के, पाच कोटी सदस्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 06:32 IST

चार दशकांनंतर प्रथमच नीचांकी

नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील (पीएफ) व्याजदरात कपात करण्याचा निर्णय भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) घेतला आहे. त्यामुळे आता हा व्याजदर ८.१ टक्के असेल. गेल्या चार दशकांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. यापूर्वी १९७७-७८ या आर्थिक वर्षात पीएफवरील व्याजदर ८ टक्के होता. सध्याचा व्याजदर ८.५ टक्के आहे. ईपीएफओच्या व्याजदर कपातीच्या निर्णयाचा पाच कोटी  सदस्यांना फटका बसणार आहे.  

ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या शनिवारी झालेल्या बैठकीत २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२०-२१ या वर्षासाठी पीएफचा व्याजदर ८.५ टक्के ठेवण्याचा निर्णय मार्च २०२१ मध्ये घेण्यात आला होता. त्याला गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वित्त मंत्रालयाने मंजुरी दिली होती.  दरम्यान, या निर्णयावर अनेक राजकीय पक्षांनी टीका केली आहे.

मतदारांना ‘रिटर्न गिफ्ट’; विराेधकांचा टाेला

पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपला भरभरून मते दिली. पंजाब वगळता चारही राज्यांमध्ये भाजपने सत्ता टिकवली. आता या निवडणूक विजयाचे मतदारांना ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून पीएफचा व्याजदर घटविण्यात आला आहे. देशातील ८४ टक्के लोकांचे उत्पन्न त्यामुळे घटणार आहे. निवडणूक विजयाच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या बचतीवर असा हल्ला करणे कितपत योग्य आहे? - रणदीप सुरजेवाला, काँग्रेसचे प्रवक्ते.

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीBJPभाजपा