उतार्‍यावरील सोसायटीचे नाव कमी करा

By Admin | Updated: March 22, 2016 00:41 IST2016-03-22T00:41:29+5:302016-03-22T00:41:29+5:30

जळगाव : पाचोरा तालुक्यातील कृष्णापुरी येथील तेजमल राठोड व पंडित वंजारी यांच्या नावे असलेल्या प्लॉटच्या उतार्‍यावर वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती सह.गृहनिर्माण संस्था यांच्या नावे आहे. या उतार्‍यावर इतर हक्कात प्लॉट मालकांचे नावे आहेत. ही संस्था सहकार विभागातर्फे अवसायनात काढण्यात आली आहे. त्याबाबत माहिती देऊनदेखील संबंधित अधिकार्‍यांकडून न्याय मिळत नाही. उतार्‍यावरील सोसायटीचे नाव कमी करून आपल्या नावाचा उतारा द्यावा अशी मागणी तेजमल राठोड व पंडित वंजारी यांनी केली आहे.

Reduce the name of the society on the transcript | उतार्‍यावरील सोसायटीचे नाव कमी करा

उतार्‍यावरील सोसायटीचे नाव कमी करा

गाव : पाचोरा तालुक्यातील कृष्णापुरी येथील तेजमल राठोड व पंडित वंजारी यांच्या नावे असलेल्या प्लॉटच्या उतार्‍यावर वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती सह.गृहनिर्माण संस्था यांच्या नावे आहे. या उतार्‍यावर इतर हक्कात प्लॉट मालकांचे नावे आहेत. ही संस्था सहकार विभागातर्फे अवसायनात काढण्यात आली आहे. त्याबाबत माहिती देऊनदेखील संबंधित अधिकार्‍यांकडून न्याय मिळत नाही. उतार्‍यावरील सोसायटीचे नाव कमी करून आपल्या नावाचा उतारा द्यावा अशी मागणी तेजमल राठोड व पंडित वंजारी यांनी केली आहे.

आरक्षणाच्या मुद्यावरून बाराबलुतेदारांचा मोर्चा
जळगाव : ओबीसी बारा बलुतेदारांतर्फे आरक्षण मुद्यांवरून २७ मार्च रोजी दिल्ली येथील जंतर मंतर येथे महारॅली काढण्यात येणार आहे. रॅलीच्या तयारीसाठी कार्याध्यक्ष किशोर सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, कुमावत समाजाचे साहेबराव कुमावत, कुंभार समाजाचे चंद्रकांत कापडे, सखाराम मोरे, परिट समाजाचे ईश्वर मोरे यांच्यासह विविध जातीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Reduce the name of the society on the transcript