लाल इश्क! नक्षलवादी तरुण-तरुणी पडले प्रेमात, बंदूक सोडून केलं लग्न, अशी फुलली लव्ह स्टोरी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 15:06 IST2025-01-14T15:05:32+5:302025-01-14T15:06:05+5:30

Naxalite Youth Fell In Love: प्रेम हे अनेकांना बदलायला भाग पाडते. प्रेमात पडलेल्या व्यक्ती कधी कधी आपल्या प्रेमासाठी वाईट मार्ग सोडून सन्मार्गाला लागल्याचे तुम्ही ऐकलेच असेल. अशीच एक फिल्मी लव्हस्टोरी छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागातून समोर आली आहे.

Red Love! Naxalite youth fell in love, gave up their guns and got married, such a blossoming love story | लाल इश्क! नक्षलवादी तरुण-तरुणी पडले प्रेमात, बंदूक सोडून केलं लग्न, अशी फुलली लव्ह स्टोरी   

लाल इश्क! नक्षलवादी तरुण-तरुणी पडले प्रेमात, बंदूक सोडून केलं लग्न, अशी फुलली लव्ह स्टोरी   

प्रेम हे अनेकांना बदलायला भाग पाडते. प्रेमात पडलेल्या व्यक्ती कधी कधी आपल्या प्रेमासाठी वाईट मार्ग सोडून सन्मार्गाला लागल्याचे तुम्ही ऐकलेच असेल. अशीच एक फिल्मी लव्हस्टोरी छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागातून समोर आली आहे. नक्षवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बस्तरमधील एका नक्षलवादी संघटनेत सक्रिय असलेला एक तरुण आणि एक तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडले. अत्यंत खुंखार आणि दहशतीच्या वातावरणात दोघांमधील प्रेमकहाणी बहरू लागल्यानंतर या दोघांनीही हिंसाचाराचा मार्ह सोडून प्रेमाच्या रस्त्यावरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी बंदूक खाली ठेवत आत्मसमर्पण केलं आणि काही काळातच विवाहबद्ध झाले. उल्लेखनीय बाब म्हणजे छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी नक्षलवादाचा मार्ग सोडून संसाराला लागलेल्या या तरुण तरुणीच्या विवाहाला उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.

ही कहाणी आहे सुकमा जिल्ह्यातील तरुण मौसम महैश आणि तरुणी हेमला मुन्नी यांची. कधी काळी नक्षली चळवळीच्या माध्यमातून हिंसक कारवाया करणारे हे दोघेही आता घरसंसारात गुंतले आहेत. दोघेही नक्षली चळवळीत सक्रिय होते. तिथेच हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र नक्षलवादी संघटनेत सक्रिय असताना विवाह करता येत नसल्याने या दोघांचीही कोंडी झाली होती. एकीकडे नक्षली हिंसाचाराचा मार्ग आणि दुसरीकडे हे सर्व सोडून लग्न करून संसार थाटणं, असे दोन पर्याय या दोघांसमोर होते. अखेरीस या दोघांनीही दुसरा मार्ग निवडला.

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मौसम महेश आणि हेमला मुन्नी यांनी हिंसक नक्षलवादाचा मार्ग सोडण्याचा निश्चय केला. तसेच ते १२ वर्षांपासून ज्या नक्षली संघटनेत सक्रिय होते. ती सोडून ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाले. मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आणलेली नियद नेल्लानार योजना त्यांना आवडली. या दोघांनीही या योजनेंतर्गत आत्मसमर्पण केलं. तसेच आत्मसमर्पणाचे सर्व नियम पूर्ण झाल्यानंतर या दोघांनीही विवाह करण्याची तयारी सुरू केली.  अखेरीस सोमवारी मौसम महेश आणि हेमला मुन्नी यांनी अग्नीला साक्षी मानत सप्तपदी घेऊन विवाह केला. या विवाह सोहळ्याला छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय हेसुद्धा आवर्जुन उपस्थित राहिले. तसेच त्यांनी नवविवाहित दाम्पत्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.  

Web Title: Red Love! Naxalite youth fell in love, gave up their guns and got married, such a blossoming love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.