शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

'लाल किल्लाही देशद्रोहींनी बांधला आहे, मग मोदी त्यावरुन तिरंगा फडकवायचं बंद करणार का ?' - असदुद्दीन ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 15:51 IST

लाल किल्लादेखील देश्द्रोहींनी बांधला आहे, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावरुन तिरंगा फडकावणं बंद करणार का ? असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विचारला आहे.

ठळक मुद्देताजमहाल देशद्रोहींनी बांधला आहे या भाजपा आमदार संगीत सोम यांच्या वक्तव्यावर असदुद्दीन ओवेसी यांची टीकालाल किल्लादेखील देश्द्रोहींनी बांधला आहे, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावरुन तिरंगा फडकावणं बंद करणार का ? असा सवाल त्यांनी विचारला

नवी दिल्ली -  लाल किल्लादेखील देश्द्रोहींनी बांधला आहे, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावरुन तिरंगा फडकावणं बंद करणार का ? असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विचारला आहे. ताजमहाल देशद्रोहींनी बांधला आहे या भाजपा आमदार संगीत सोम यांच्या वक्तव्यावर टीका करताना त्यांनी हा प्रश्न विचारला. जर ताजमहाल देशद्रोहींनी बांधला असेल, तर योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी पर्यटकांना तिकडे न जाण्याचं आवाहन करणार का ? हा प्रश्नदेखील ओवेसी यांनी विचारला आहे. ओवेसी एवढ्यावरच थांबले नाहीत. हैदराबाद हाऊसचं बांधकामदेखील देशद्रोहींनी केलं आहे, मग मोदी परदेशी पाहुण्यांना घेऊन तिथे भेट देणं थांबवणार का ? असंही असदुद्दीन ओवेसी यांनी विचारलं आहे. 

भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहालसंबंधी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. जगातील सात आश्चर्यांमध्ये समावेश असणारा ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील डाग असल्याचं संगीत सोम बोलले आहेत. रविवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 'ताजमहाल बांधणा-यांनी उत्तर प्रदेश आणि हिंदुस्थानातील सर्व हिंदूंचा सर्वनाश करण्याचं काम केलं होतं असं संगीत सोम बोलले आहेत. अशांची नावे जर इतिहासात असतील, तर ती बदलली जातील', असं संगीत सोम बोलले आहेत. महत्वाचं म्हणजे, उत्तर प्रदेश सरकारने पर्यटन स्थळांच्या यादीतून ताजमहालला वगळल्याने नवा वाद उफाळला आला होता. यानंतर पर्यटनमंत्री रिटा बहुगुणा यांनी ताजमहाल हा सांस्कृतिक वारसा असल्याचे सांगून सारवासरव करण्याचा प्रयत्न केला होता. सोशल मीडियावर यावरुन प्रचंड टीका झाली होती.

सोम मेरठ येथील सिसौली गावात आयोजित  कार्यक्रमात संगीत सोम बोलत होते. ते बोलले की, 'उत्तर प्रदेशात एक अशी निशाणी आहे, जिला नाही म्हटलं पाहिजे. ताजमहालला ऐतिहासिक स्थळांच्या यादीत स्थान दिलं नाही म्हणून अनेकांना दु:ख झालं. कसला इतिहास, कुठला इतिहास, कुणाचा इतिहास ? तो इतिहास का, ज्यामध्ये ताजमहाल बनवणा-याने आपल्या बापाला कैद केलं होतं ? तो इतिहास का, ज्यामध्ये ताजमहाल बनवणा-याने उत्तर प्रदेश आणि हिंदुस्थानातील सर्व हिंदूंचा सर्वनाश करण्याचं काम केलं होतं ? अशा लोकांचं नाव जर आजही इतिहासात असेल, तर हे खूपच दुर्भाग्यपुर्ण आहे. मी गॅरंटी देऊन सांगतो की इतिहास बदलला जाईल'. 

योगी आदित्यनाथ सरकारने या अर्थसंकल्पात ताजमहालला सांस्कृतिक वारसा स्थळांच्यायादीत समाविष्ट केले नव्हते. त्यांनी ताजमहालला भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानण्यास नकार दिला होता. ताजमहल हा एका इमारतीशिवाय काहीही नाही, असे ते म्हणाले होते. भारताचे पंतप्रधान परदेशी जाताना तेथील राष्ट्रप्रमुखांना आपल्या सांस्कृतीचे प्रतिनिधित्व करणा-या वस्तू घेऊन जात. त्यात ताजमहालची प्रतिकृती असे, तसेच परदेशी पाहुण्यांनाही भारतात आल्यावर ती दिली जात असे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा परदेशात गेले, तेव्हा त्यांनी संबंधित देशांच्या प्रमुखांना भगवद्गीता व रामायणच्या प्रती भेट म्हणून दिल्या होत्या, याचा उल्लेख आदित्यनाथ यांनी बिहारमधील एका मेळाव्यात केला होता. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीTaj MahalताजमहालBJPभाजपा