नीरव मोदीच्या मेहुण्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस; लंडनमध्ये वास्तव्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 06:15 AM2018-09-26T06:15:11+5:302018-09-26T06:15:20+5:30

हाँगकाँग, बेल्जियम व संयुक्त अरब अमिरातीतून हिऱ्यांचा व्यवसाय करणारा मयंक मेहता याच्यावर इंटरपोलने रेड नोटीस बजवावी, यासाठी भारतीय तपास यंत्रणा प्रयत्नशील आहेत.

 Red Corner Notice against Neerav Modi's brother-in-law; Suspicion of residence in London | नीरव मोदीच्या मेहुण्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस; लंडनमध्ये वास्तव्याचा संशय

नीरव मोदीच्या मेहुण्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस; लंडनमध्ये वास्तव्याचा संशय

Next

 नवी दिल्ली : हाँगकाँग, बेल्जियम व संयुक्त अरब अमिरातीतून हिऱ्यांचा व्यवसाय करणारा मयंक मेहता याच्यावर इंटरपोलने रेड नोटीस बजवावी, यासाठी भारतीय तपास यंत्रणा प्रयत्नशील आहेत. फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याची बहीण पूर्वी ही मयंक मेहताची पत्नी आहे. मयंक मेहताकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे.
मयंक मेहता व पूर्वी मेहता यांनी मिळून पंजाब नॅशनल बँकेच्या निधीचा हवाला व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बेल्जियमची नागरिक असलेल्या पूर्वी मेहताविरुद्ध १५ दिवसांपूर्वी रेड नोटीस जारी झाली असून, नीरव, त्याचा भाऊ निशाल आणि विश्वासू सहकारी मिहिर भन्साळी यांच्यावर आंतरराष्ट्रीय नोटीस बजावण्यात आलेली आहे.
पीएनबी आर्थिक गैरव्यवहाराच्या तपास अधिकाºयाने सांगितले की, रेड नोटीसची विनंती फ्रान्समधील लियोन येथे इंटरपोलच्या मुख्यालयात ती लवकरच पाठविली जाईल. बनावट कंपन्यांची माहिती व पत्नीच्या मदतीने त्याने नीरवकडे किती पैसे वळते केले, हे माहिती करून घेण्यासाठी मयंक मेहता याचा ठावठिकाणा, अटक आणि भारतात प्रत्यार्पण आवश्यक आहे. मेहता इंग्लडमध्ये राहात असावा, असे आम्हाला वाटते. (वृत्तसंस्था)

लपण्यासाठी नीरवलाही मदत केल्याचा संशय
पंजाब नॅशनल बँकेतील १३,५७८ कोटींच्या घोटाळ्यात केंद्रीय गुप्तचर खाते (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आधीच आरोपपत्र दाखल केलेले आहे. नीरव मोदी हा मयंक मेहताच्याच मदतीने इंग्लडमध्ये लपून बसल्याचा संशय भारतीय तपास यंत्रणांना आहे.

Web Title:  Red Corner Notice against Neerav Modi's brother-in-law; Suspicion of residence in London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.