शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

BSNLमध्ये १ हजार नोकऱ्या; महाराष्ट्रभरात भरती, पुण्यात सर्वाधिक जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 10:41 IST

राज्यात १,१६३ जणांची नियुक्ती : कामावर परिणाम झाल्याने निर्णय

खलील गिरकर 

मुंबई : तोट्यात गेलेल्या बीएसएनएलने आर्थिक भार कमी करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती योजना राबवली असताना कंत्राटी नोकरभरती करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात ३१ जानेवारीला ८,५४४ कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या सेवानिवृत्तीचा कामावर परिणाम झाल्याने अवघ्या २० दिवसांत तातडीची उपाययोजना म्हणून राज्यात १,१६३ कर्मचाऱ्यांची तातडीने कंत्राटी नियुक्ती करण्यात येणार आहे.

स्वेच्छानिवृत्तीचा फटका बीएसएनएलच्या राज्यभरातील कामाला बसू लागला असल्याने, प्रशासनाने राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये व गोव्यात तातडीने १,१६३ कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. ही भरती ३० एप्रिलपर्यंतच्या कालावधीसाठी असून, तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले जाईल. त्यानंतर, राज्यभरातील कामाचा व कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेचा आढावा घेऊन नेमकी किती कर्मचाऱ्यांची भरती करायची, याचा निर्णय घेतला जाईल व त्याप्रमाणे, निविदा प्रक्रिया राबवून कंत्राट पद्धतीने भरती केली जाईल. बीएसएनएलचे उपमहाव्यवस्थापक (प्रशासन) के.एच.मोरे यांच्या स्वाक्षरीने हे निर्देश देण्यात आले आहेत. बीएसएनएलची सेवा विस्कळीत होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबईत बीएसएनएलची सेवा नसल्याने मुंबईत या टप्प्यात कोणतीही भरती करण्यात येणार नाही. मात्र, गरज भासल्यास पुढील टप्प्यात भरती प्रक्रिया राबविली जाईल, असे सांगण्यात आले.राज्यात सर्वाधिक ११० जणांची भरती पुण्यात करण्यात येईल, तर सोलापूरमध्ये सर्वात कमी १३ जणांची भरती होईल.कुठे किती जणांची गरज ?पुणे- ११०, अहमदनगर- ७५,अकोला- ५५, अमरावती- ५५, औरंगाबाद- ६३, भंडारा- २४, बीड- १८, बुलडाणा- २५, चंद्रपूर- २२, धुळे- ४५, गडचिरोली- ३२, जळगाव- ५०, जालना- २४, कल्याण- ७५, कोल्हापूर- ५०, लातूर- २४, नागपूर- ५०, नांदेड- २९, नाशिक- ७५, उस्मानाबाद- २५, परभणी- २४, रायगड- ३०, रत्नागिरी- ३६, सांगली- २०, सातारा- २०, सिंधुदुर्ग- ४०, सोलापूर- १३, वर्धा- १४, यवतमाळ- २० व गोवा- २०स्वेच्छानिवृत्त कर्मचारी : देशात ३१ जानेवारीला बीएसएनएलच्या १ लाख ५३ हजार ७८६ कर्मचाऱ्यांपैकी ७८ हजार ५६९ जणांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे. महाराष्ट्रातील १३ हजार ६७२ कर्मचाऱ्यांपैकी ८,५४४ जणांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्याने ५,१२८ जण कार्यरत आहेत.

टॅग्स :BSNLबीएसएनएलjobनोकरी