शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

खासगीकडून शुल्क वसुली; सरकारीमध्ये नेट बँकिंग समस्या; बँकांच्या कामकाजाविषयी लाखो ग्राहकांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 07:37 IST

सरकारी, खासगी आणि विदेशी बँकांच्या तक्रारी जवळपास एकसारख्याच आहेत. मात्र, कोणतेही कारण न सांगता वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारण्यामध्ये खासगी बँका आघाडीवर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील बँकांशी संबंधित तक्रारी दरवर्षी वाढत असून, यंदा या तक्रारी तीन लाख ४० हजारांच्या पुढे गेल्या आहेत. एटीएम, डेबिटकार्ड आणि क्रेडिटकार्ड संबंधित सर्वाधिक तक्रारी बँकिंग लोकपालांच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत.

सरकारी, खासगी आणि विदेशी बँकांच्या तक्रारी जवळपास एकसारख्याच आहेत. मात्र, कोणतेही कारण न सांगता वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारण्यामध्ये खासगी बँका आघाडीवर आहेत. तर, दुसरीकडे मोबाइल, नेट बँकिंगच्या प्रकारांमध्ये सरकारी बँकांचे ग्राहक अधिक तक्रारी करत आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, एका वर्षात एटीएम, डेबिटकार्ड आणि क्रेडिटकार्डशी संबंधित सर्वाधिक ४९ हजार २६८ तक्रारी सरकारी बँकांशी संबंधित ग्राहकांनी केल्या. याबाबत खासगी बँकांशी संबंधित ३७ हजार ८८४ तक्रारी होत्या, तर दुसरीकडे न सांगता वेगवेगळे शुल्क आकारले म्हणून खासगी बँकांच्या ११ हजार ५७७ तक्रारी करण्यात आल्या आहेत.सरकारी बँकांशी संबंधित अशा तक्रारी ७ हजार ७८९ होत्या. 

तर, मोबाइल नेट बँकिंगच्या प्रकारामध्ये सरकारी बँकांच्या ग्राहकांनी सर्वात जास्त २७ हजार ४३८ तक्रारी केल्या. खासगी बँकांशी संबंधित अशा तक्रारी १२ हजार ६४७ राहिल्या आहेत.देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या विरोधात बँकिंग लोकपाल कार्यालयात सर्वात जास्त म्हणजे ७४ हजार ११९  तक्रारी करण्यात आल्या आहेत. २४ हजार ९९८ तक्रारी या पंजाब नॅशनल बँकेशी संबंधित होत्या. तर, १६ हजार २६५ तक्रारी या बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांनी केल्या आहेत. 

खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेच्या विरुद्ध सर्वात जास्त ३४ हजार ४२० तक्रारी करण्यात आल्या आहेत. २८ हजार तक्रारी आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांनी केल्या आहेत. तर, २१ हजार, ११ तक्रारी या ॲक्सिस बँकेच्या ग्राहकांनी केल्या आहेत.

बँकांकडून ग्राहकांना सेवा देण्यात काही त्रुटी राहिली तर बँक लोकपाल संबंधित बँकेला निर्देश देतात. देशात ९० च्या दशकापासून बँकिंग लोकपाल अस्तित्वात आहे, मात्र त्याबाबत अद्यापही पुरेशी माहिती अनेकांना नाही. 

प्रमुुख बँकांबाबत ग्राहकांच्या तक्रारीबँक           तक्रारीएसबीआय       १९,८६५एचडीएफसी      ११,४७८पीएनबी       ७,१९९आयसीआयसीआय     ६,७४०आरबीएल      ५,६०१

टॅग्स :bankबँक