शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

महाकुंभात मोठा विक्रम... आतापर्यंत ५० कोटी भाविकांचे गंगेत स्नान; CM योगी आदित्यनाथ म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 18:12 IST

Maha Kumbh 2025 : सध्या सरकारी आकडेवारीनुसार, महाकुंभमध्ये पवित्र स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या ५० कोटींपेक्षा जास्त झाली आहे.

Maha Kumbh 2025 :  लखनौ : उत्तर प्रदेशातीलप्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठे विधान केले आहे. महाकुंभमेळ्यात ५० ते ५५ कोटी येतील, ज्यामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. तसेच, महाकुंभमेळ्याच्या आयोजनासाठी १५०० कोटी रुपये खर्च झाले असून त्या बदल्यात ३ लाख कोटी रुपयांचा फायदा होत आहे, असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

सध्या सरकारी आकडेवारीनुसार, महाकुंभमध्ये पवित्र स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या ५० कोटींपेक्षा जास्त झाली आहे. आतापर्यंत कोणत्याही कार्यक्रमात इतक्या मोठ्या संख्येने लोक सहभागी झाल्याचे पुरावे मिळालेले नाहीत, असे म्हटले जात आहे. दरम्यान, महाकुंभमेळा संपण्यास अजून बराच वेळ आहे. महाकुंभमेळ्यातील शेवटचे अमृत स्नान देखील बाकी आहे, जे महाशिवरात्रीला होणार आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

ब्राझीलच्या रिओ कार्निव्हल किंवा जर्मनीच्या ऑक्टोबर फेस्टमध्ये जमणारी मोठी गर्दी देखील प्रयागराजमधील आयोजित महाकुंभमेळ्याच्या तुलनेत काहीच नाही. दरम्यान, रिओ कार्निव्हल हा ब्राझीलमधील रिओ डी जानेरो शहरात साजरा केला जाणारा एक मोठा उत्सव आहे. तर ऑक्टोबर फेस्ट हा जर्मनीतील म्युनिक येथे साजरा केला जाणारा वार्षिक उत्सव आहे. जो सप्टेंबरच्या शेवटी सुरू होतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी संपतो.

याचबरोबर, आज प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात आणखी एक नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे. महाकुंभदरम्यान ३०० स्वच्छता कर्मचाऱ्यांनी गंगा आणि संगम नदीवरील राम घाट, गंगेश्वर घाट आणि भारद्वाज घाट या तीन घाटांची अर्धा तास सतत स्वच्छता करून एक नवा विक्रम केला आहे.  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स टीमचे ज्युरी सदस्य प्रवीण पटेल यांच्या देखरेखीखाली हा नवा विक्रम करण्यात आला आहे. महाकुंभमेळ्यात घडलेला हा अनोखा विक्रम याआधी जगात कोणीही केलेला नाही.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशPrayagrajप्रयागराज