रेकॉर्डब्रेक! यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बत 67.1 टक्के मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 04:54 PM2019-05-21T16:54:49+5:302019-05-21T16:57:00+5:30

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्येही मतदारांचा भरपूर उत्साह दिसून आला असून, सात टप्प्यात झालेल्या मतदानामध्ये विक्रमी मतदान झाले आहे.

Record Break! In the current parliamentary elections, 67.1 per cent of the total voting was held | रेकॉर्डब्रेक! यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बत 67.1 टक्के मतदान 

रेकॉर्डब्रेक! यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बत 67.1 टक्के मतदान 

Next

नवी दिल्ली - सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आटोपून आता निकालाची वेळ आली आहे. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्येही मतदारांचा भरपूर उत्साह दिसून आला असून, सात टप्प्यात झालेल्या मतदानामध्ये तब्बल 67.1 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गेल्यावेळच्या मतदानापेक्षा मतदानाचा टक्का यावेळी वाढला आहे.
 
2014 च्या लोकसभा निवडणुकीत 543 जागांसाठी 66.44 टक्के मतदान झाले होते. त्यापेक्षा यावेळी अधिक मतदान झाले आहे. गेल्या 16 लोकसभा निवडणुकांचा आढावा घेतल्यास मतदानाच्या टक्केवारीमध्ये सातत्याने चढउतार होत असल्याचे दिसून येते. 

1951-52 मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सर्वात कमी होती. त्यावेळी केवळ 45.67 टक्के मतदान झाले होते. नंतरच्या काळाता थोड्या बहुत प्रमाणात का होईना मतदानाची टक्केवारी वाढत गेली. 1957 मध्ये 47.74 टक्के, 1962 मध्ये 55.42 टक्के, 1967 मध्ये 61.33 टक्के, 1971 मध्ये 55.88 टक्के, 1977 मध्ये 60.49 टक्के,  1980 मध्ये 56.92 टक्के,  1984-85 मध्ये 64.01 टक्के, 1989 मध्ये 61.95 टक्के, 1991-92 मध्ये 55.88 मध्ये,  1996 मध्ये 57.94 टक्के,  1998 मध्ये 61.97 टक्के, 1999 मध्ये 59.99 टक्के, 2004 मध्ये 57.19 टक्के, 2009 मध्ये 58.19 टक्के आणि 2014 मध्ये 66.44 टक्के मतदान झाले होते.  


आता नुकत्याचा आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाने प्रथमच 67 टक्क्यांचा आकडा पार केला आहे. यावेळी 67.1 टक्के मतदान झाले आहे.  

Web Title: Record Break! In the current parliamentary elections, 67.1 per cent of the total voting was held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.