13 हजार विहिरींचे पुनर्भरण
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:41+5:302015-03-14T23:45:41+5:30
र्शावण क्षीरसागर : सांगोला तालुक्यातून 59 गावांचा समावेश

13 हजार विहिरींचे पुनर्भरण
र शावण क्षीरसागर : सांगोला तालुक्यातून 59 गावांचा समावेशसांगोला : जलशिवार अभियानांतर्गत सांगोला तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतीने लोकसहभागातून वेगवेगळ्या पद्धतीचे बंधारे व विहिरीतून गाळ काढण्याची कामे येत्या मार्चअखेर पूर्ण करून घ्यावीत. तालुक्यात 59 गावांमधून एकाचवेळी 13 हजार विहिरींच्या पुनर्भरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, गावोगावच्या ग्रामस्थांच्या पुढाकाराने जलशिवार अभियान यशस्वी करावे, असे आवाहन प्रांताधिकारी र्शावण क्षीरसागर यांनी केले आहे. राज्यामध्ये महत्त्वाकांक्षी जलशिवार अभियान सुरु असून, गावोगावच्या विकासकामांचा आराखडा आखण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सांगोला तालुक्यात ‘क’ तीनची कामे लोकसहभागातून करावयाची असल्याने प्रांताधिकारी र्शावण क्षीरसागर यांनी गुरुवारी शासकीय विभागाचे अधिकारी, कृषी अधिकारी, कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक पंचायत समिती बचत भवनात घेतली.यावेळी तहसीलदार र्शीकांत पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, तालुका कृषी अधिकारी अशोक मोरे, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता महारुद्र अंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता पुरुषोत्तम अंधारे, सा.बां.विभागाचे उपअभियंता थोंटे, लघु पाटबंधारे उपविभागीय अधिकारी विनायक खरात, नीरा उजवा कालवा उपविभागीय अधिकारी शेंडे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते. तालुक्यात जलशिवार अभियानातून गावोगावी विकास कामाचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. तयार झालेले आराखडे जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून, मंजूर कामे येत्या मार्चअखेर पूर्ण करून घ्यावयाची आहेत. तालुक्यात ‘क’ वर्गातील कामे लोकसहभागातून करावयाची असल्याने अधिकार्यांची जबाबदारी वाढणार आहे. तालुक्यातील 93 साखळी बंधार्यातील गाळ काढणे, 193 मातीनाला बंधारे बांधणे, 6 विहीर खोलीकरण, 5 हजार 72 विहीर पुनर्भरणाची कामे लोकसहभागातून करावयाची आहेत. जलशिवार अभियानातून निवडलेली कामे पारदर्शकपणे होण्याच्या अनुषंगाने चार गावांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पर्यवेक्षक अधिकार्याची नेमणूक करण्यात आली आहे.प्रत्येक ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या बंधार्यातील गाळ काढण्याची कामे शुक्रवारपासून सुरु करावीत. त्यादृष्टीने ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकार्यांनी गावनिहाय बैठका घेऊन कामाचे नियोजन करावे. लोकसहभागाच्या माध्यमातून कामे पूर्ण करण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचार्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत अशा सूचना प्रांताधिकारी र्शावण क्षीरसागर यांनी दिल्या आहेत. जलशिवार अभियान यशस्वी राबविण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचार्यांनी आपापले कर्तव्य चोख बजावावे. ज्याठिकाणी अडीअडचणी उभ्या राहतील अशावेळी प्रशासन तुमच्या पाठीशी राहील. वेळप्रसंगी कर्मचार्यांनी वरिष्ठ अधिकार्यांचे मार्गदर्शन जरुर घ्यावे. जलशिवार अभियानाचा लाभ गावागावांना मिळणार असून लोकसहभाग वाढविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत असे आवाहन तहसीलदार र्शीकांत पाटील यांनी केले. निवड झालेली गावेकोळा, तिप्पेहळ्ळी, पाचेगाव खुर्द, बुद्धेहाळ, गौडवाडी, ह.मंगेवाडी, राजुरी, झापाचीवाडी, काळूबाळूवाडी, पाचेगाव बु॥, जुनोनी, वाटंबरे, चोपडी, नाझरा, सरगरवाडी, चिणके, बलवडी, य.मंगेवाडी, लोणविरे, हणमंतगाव, सोनंद, जवळा, भोपसेवाडी, आगलावेवाडी, बुरंगेवाडी, घेरडी, वाकी घेरडी, वाणीचिंचाळे,पारे, हंगिरगे, डिकसळ, नराळे, कडलास, अकोला, कमलापूर, एखतपूर, चिंचोली, धायटी, सावे, शिवणे, वाकी शिवणे, बागलवाडी, सोनलवाडी, अचकदाणी, लोटेवाडी, खवासपूर, कटफळ या गावांची जलशिवार अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. कोट ::::::::::::::::जलशिवार अभियानातून ‘क’ एकची सुमारे 14 कोटी 85 लाख रुपये खचरून 188 कामे सुरु आहेत. तर ‘क’ दोनमध्ये पावसाळ्यात शिवारात पडलेले पाणी शिवारात अडविण्यासाठी 2 हजार 53 कामांचा 45 कोटींचा आराखडा जिल्हा समितीकडे सादर केला आहे. ‘क’ तीनमध्ये तालुक्यात जलस्रोताच्या माध्यमातून झालेल्या 5 हजार 795 कामांच्या दुरुस्ती देखभालीसाठी 29 कोटी रुपयांची कामे लोकसहभागातून पूर्ण करावयाची आहेत.- र्शीकांत पाटीलतहसीलदार, सांगोला