कालिया नागाचा पुनर्जन्म म्हणजे मोदी -लालूप्रसाद

By Admin | Updated: July 27, 2015 00:14 IST2015-07-26T23:39:53+5:302015-07-27T00:14:50+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला भगवान कृष्णाच्या जन्मभूमीचे मूळ रहिवासी असल्याचे सांगत बिहारमधील यादव मतदारांना जोडण्याचा

The rebirth of Kaliya Naga is Modi-Laloo Prasad | कालिया नागाचा पुनर्जन्म म्हणजे मोदी -लालूप्रसाद

कालिया नागाचा पुनर्जन्म म्हणजे मोदी -लालूप्रसाद

पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला भगवान कृष्णाच्या जन्मभूमीचे मूळ रहिवासी असल्याचे सांगत बिहारमधील यादव मतदारांना जोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी मोदींना ‘कालिया नागा’ची उपमा दिली. या कालिया नागाला आम्ही चिरडून टाकू, असे लालूप्रसाद म्हणाले.
मोदी यांनी शनिवारी पाटणा येथील जाहीर सभेत लालूप्रसाद आणि बिहारमधील जंगलराजची तुलना कृष्ण आणि कालिया नागाशी केली होती. ‘कृष्णाने कालिया नागाचा वध केला होता. या नागाने नरेंद्र मोदींच्या रूपात पुनर्जन्म घेतलेला आहे. या नागाने आधी गुजरातला दंश केला आणि आता संपूर्ण बिहारला दंश करू पाहात आहे. जातीय जनगणनेची आकडेवारी जारी करण्याच्या मागणीसाठी गांधी मैदानावर एक दिवसाच्या उपोषणाला प्रारंभ केल्यानंतर लालूप्रसाद यादव पत्रकारांशी बोलत होते. शनिवारी मोदी यांनी जाहीर सभेत यादव समाजाला जोडण्याच्या उद्देशाने त्यांचा ‘यादू भाई’ असा उल्लेख केला होता. तसेच आपण कृष्ण भूमीचेच असल्याचा दावाही केला होता.
लालूप्रसाद घोडागाडीत बसून उपोषणस्थळी आले. जातीय जनगणनेची आकडेवारी तत्काळ जारी करण्याची मागणी करून ते म्हणाले, यामुळे देशात एससी, एसटी लोकसंख्या किती आहे, हे कळेल

Web Title: The rebirth of Kaliya Naga is Modi-Laloo Prasad