बंडखोर चौकट

By Admin | Updated: April 25, 2015 02:10 IST2015-04-25T02:10:35+5:302015-04-25T02:10:35+5:30

Rebellious box | बंडखोर चौकट

बंडखोर चौकट

>चौकट
बंडखोरांमुळेच वातावरण बदलले
विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण लागले होते. नागरिकांमध्येही त्यांच्याविषयी नकारात्मक प्रतिमा तयार होवू लागली होती. परंतु ऐन निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजपामध्ये बंडखोरी व अंतर्गत वाद सुरू झाले. यामुळे राष्ट्रवादीवरील टीका व फुटीचे महत्त्व कमी होवून सर्वांचे लक्ष बंडखोरांवर लागले. यामुळे नागरिकांमध्ये शिवसेना व भाजपाविषयी नकारात्मक संदेश जावू लागला व त्यामुळेच अपेक्षित यश मिळाले नाही.

बंडखोरांमुळे हरलेल्या महत्त्वाच्या जागा
प्रभाग ५१ मध्ये राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारास ८४९ मते मिळाली. भाजपा व शिवसेनेच्या बंडखोरांची मते ९६४ एवढी आहेत. प्रभाग ७३ मध्ये राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारास १४६५ मते मिळाली आहेत. शिवसेनेचा अधिकृत व सेना व भाजपाचा बंडखोर उमेदवार यांना तब्बल २७५४ मते मिळाली आहेत. प्रभाग ७६ मध्ये राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारास १३२८ मते मिळाली. शिवसेनेच्या अधिकृत व बंडखोर उमेदवारास २११२ मते मिळाली आहे.

Web Title: Rebellious box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.