शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर आमदारांकडून गोव्याचा प्लॅन रद्द; मुंबई पुन्हा एकदा कर्नाटक नाट्याच्या केंद्रस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 11:07 IST

सर्व मंत्र्यांनी राजीनामे देऊनही कर्नाटकातील राजकीय नाट्य संपेना

बंगळुरु: कर्नाटकातील राजकीय नाट्य आता अखेरच्या टप्प्यात आलं आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळातील काँग्रेस, जेडीएसच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिल्यानं कर्नाटकमधील नाट्यावर पडदा पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र बंडखोर आमदार अद्यापही अडून बसले आहेत. आमदारकीचा राजीनामा देणारे बंडखोर नेते आज गोव्याला जाणार होते. मात्र त्यांनी अचानक ही योजना रद्द केली आणि मुंबईत थांबण्याचा निर्णय घेतला. सध्या मुंबईतील अज्ञातस्थळी सर्व बंडखोर आमदार वास्तव्यास आहेत. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा कर्नाटकातील राजकीय नाट्याच्या केंद्रस्थानी आली आहे. काँग्रेस, जेडीएसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतरही बंडखोर आमदारांनी तलवार मान्य केलेली नाही. त्यामुळे भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शनिवारपासून कर्नाटकमध्ये राजकीय नाट्य जोरात आहे. काँग्रेस, जेडीएसच्या १३ आमदारांनी राजीनामा दिल्यानं सत्ता नाटक सुरू झालं. कर्नाटकात कोणाचं सरकार येणार, हे ठरवू शकणारे हे आमदार सध्या मुंबईत आहेत. ते आज गोव्याला जाणार होते. मात्र ऐनवेळी त्यांनी ही योजना रद्द करत मुंबईत अज्ञातस्थळी राहण्याचा निर्णय घेतला.बंडखोर आमदारांना मंत्रिपदांची ऑफर देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी केला. मात्र तो निष्फळ ठरला. सोमवारी सकाळी हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत बंडखोर आमदारांना मंत्रिपदांची ऑफर देण्यात आली. मात्र सध्याचं काँग्रेस सरकार अस्थिर असल्याचं म्हणत या आमदारांनी मंत्रिपदं स्वीकारण्यास नकार दिला. बंडखोर आमदार भाजपा सरकारमध्ये सामील होण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं जात आहे. या आमदारांचं वास्तव्य असलेल्या वांद्र्यातील सोफिटेल हॉटेलवर भाजपाकडून नजर ठेवली जात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होती. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा