शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटाखाली ‘ते’ बंडखोर आमदार भाजपमध्ये; ज्योतिरादित्यांनी दिला 'शब्द'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 19:36 IST

पक्ष प्रवेश भाजपाच्या मुख्यालयात न घेता भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी करण्यात आला. यावेळी घरासमोरील लॉनमध्ये गोलाकार आकारामध्ये खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देमध्य प्रदेश विधानसभाध्यक्षांनी या आमदारांचे राजीनामे मंजूर केल्याने कमलनाथ सरकार पडले.कमलनाथांनी कालच राजीनामा राज्यापालांकडे सोपवत बहुमत चाचणी टाळली होती.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशमधील बहुमतातील काँग्रेसचे सरकार पाडणारे २२ आमदारांनी आज अत्यंत साध्या कार्यक्रमात भाजपामध्ये प्रवेश केला. कोरोनाचे सावट या मोठ्या घटनेवर असल्याचे दिसून आले.

ज्योतिरादित्य शिंदेंनी नाराजीमुळे काँग्रेसमध्ये बंडखोरी करत भाजपामध्ये प्रवेश केला होता. यावेळी १९ समर्थक आमदारांना त्यांनी बंगळुरूमध्ये ठेवले होते. यामध्ये आणखी तीन जणांची भर पडली होती. दरम्यान, एका आमदाराच्या मुलीने आत्महत्या केल्याने त्यांना राजस्थानला पाठविण्यात आले होते.

मध्य प्रदेश विधानसभाध्यक्षांनी या आमदारांचे राजीनामे मंजूर केल्याने कमलनाथ सरकार पडले. कमलनाथांनी कालच राजीनामा राज्यापालांकडे सोपवत बहुमत चाचणी टाळली होती. यामुळे आज बंडखोर आमदारांनी दिल्ली गाठत भाजपमध्ये प्रवेश केला.

हा पक्ष प्रवेश भाजपाच्या मुख्यालयात न घेता भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी करण्यात आला. यावेळी घरासमोरील लॉनमध्ये गोलाकार आकारामध्ये खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी ज्योतिरादित्य शिंदे देखील उपस्थित होते. मध्य प्रदेशमध्ये आता २५ जागांवर पोट निवडणूक घेतली जाईल. ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितले की, या सर्व आमदारांना पुन्हा पोटनिवडणुकीचे तिकिट देण्यात येणार आहे. प्रत्येक आमदाराचा पक्षात सन्मान करण्यात येईल असे आश्वासन नड्डा यांनी दिले दिल्याचे म्हटले.

 

 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस